श्रीरामपूर सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. विश्राम निकम तर व्हा. चेअरमन पदी वर्षा निकम
देवळा(जि. नाशिक) ; श्रीरामपूर (वाखारवाडी) विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉ. विश्राम निकम यांची तर व्हा चेअरमन पदी वर्षा निकम यांची आज बुधवार दि. २८ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
देवळा येथील सहाय्य निबंधक कार्यालयात सोसायटीचे तत्कालीन चेअरमन परशराम निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रिक्त जागेसाठी चेअरमन पदी डॉ. विश्राम निकम यांची तर व्हा. चेअरमन पदी वर्षा निकम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन पदासाठी सूचक म्हणून रवींद्र निकम यांनी तर अनुमोदक म्हणून परशराम निकम यांनी स्वाक्षरी केली .तर व्हॉइस चेअरमन पदासाठी सुचक म्हणून भारत गोसावी यांनी तर अनुमोदक म्हणून दत्तू निकम यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी संचालक राजेंद्र निकम, दत्तू निकम , भारत गोसावी, सगुनाबाई अहिरे आदींसह सचिव विलास ठाकरे, कर्मचारी भाऊसाहेब निकम आदी उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हेही वाचा
Arjun Kapoor : ‘निगेटिव्ह शेड्सच्या भूमिका माझ्यासाठी नवं आयुष्य घेऊन आल्या’
Rohit Sharma Records : रोहित शर्माच्या निशाण्यावर 2 मोठे विक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरेल पहिला खेळाडू
नरेंद्र मोदींच्या सभेत काँग्रेससाठी देणगी; राहुल गांधीचा फोटो, क्यूआर कोड
Latest Marathi News श्रीरामपूर सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. विश्राम निकम तर व्हा. चेअरमन पदी वर्षा निकम Brought to You By : Bharat Live News Media.