Weather Update : आजपासून ढगाळ वातावरण; उद्या पावसाची शक्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात बुधवारपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, गुरुवारपासून बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात होऊन गेलेल्या मिथीली चक्रीवादळाचा परिणाम म्हणून हा पाऊस येणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. • किमान व कमाल तापमानात घट होणार • मिथीली चक्रीवादळाचा … The post Weather Update : आजपासून ढगाळ वातावरण; उद्या पावसाची शक्यता appeared first on पुढारी.

Weather Update : आजपासून ढगाळ वातावरण; उद्या पावसाची शक्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात बुधवारपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, गुरुवारपासून बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात होऊन गेलेल्या मिथीली चक्रीवादळाचा परिणाम म्हणून हा पाऊस येणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
• किमान व कमाल तापमानात घट होणार
• मिथीली चक्रीवादळाचा परिणाम
गेल्या आठ दिवसांपासून बंगालच्या उपसागरात मोठ्या हालचाली सुरू आहेत. तेथे तयार झालेले मिथीली हे आज- वरचे सर्वांत छोट्या कालावधीचे चक्रीवादळ ठरले. अवघ्या बारा तासांत ते शमले. मात्र, त्याने समुद्र खवळला आणि पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे भारतीय किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळ, तमिळनाडू ते आंध्र प्रदेश किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे.
बुधवारी ढगांची गर्दी
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे वेगाने येत आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात २३ ते २६, तर मराठवाडा विदर्भात २४ ते २६ दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
मिथीली चक्रीवादळामुळे अशी स्थिती…
बंगालच्या उपसागरात वारंवार चक्रीवादळांची स्थिती यंदा तयार होत असल्याने किमान तापमानात सतत वाढ होत आहे. पाच दिवसांपूर्वी मिथीली नावाचे चक्रीवादळ तयार झाल्याने तेथे पुन्हा वाऱ्याचा वेग वाढला व बाष्पयुक्त वारे देशभर वाहू लागले असून, राज्यात बुधवारपासून ढगाळ वातावरण तयार होऊन गुरुवार ते शनिवारपर्यंत पाऊस पडेल.
सिकर थंड, डहाणू सर्वांत उष्ण.. बंगालच्या उपसागरातील
हालचालींमुळे देशभरातील तापमानात विचित्र बदल होताना दिसत आहेत. मंगळवारी राजस्थानातील सिकर येथे किमान तापमान ९.५ अंश इतके सर्वांत कमी तापमान होते. तर, कोकणातील डहाणू येथे कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले
66 राज्यात बुधवारपासून ढगांची जमवाजमव होण्यास सुरुवात होईल. तर, गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस होईल. तर शुक्रवारपासून विदर्भ, मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानात घट होण्यास सुरुवात होईल.
-अनुपम कश्यपी, विभाग प्रमुख, हवामान विभाग, पुणे

हेही वाचा
जाहिरातींसाठी पैसा आहे, पण प्रकल्पांसाठी नाही; सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला फटकारले
पंढरपूर : ‘कार्तिकी’साठी पंढरी गजबजली
अयोध्येतील राम मंदिरातील पुजार्‍यांच्या 20 जागांसाठी आले 3 हजार अर्ज
The post Weather Update : आजपासून ढगाळ वातावरण; उद्या पावसाची शक्यता appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात बुधवारपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, गुरुवारपासून बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात होऊन गेलेल्या मिथीली चक्रीवादळाचा परिणाम म्हणून हा पाऊस येणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. • किमान व कमाल तापमानात घट होणार • मिथीली चक्रीवादळाचा …

The post Weather Update : आजपासून ढगाळ वातावरण; उद्या पावसाची शक्यता appeared first on पुढारी.

Go to Source