‘त्या’ अंतराळवीरासोबत लग्न झाल्याची माहिती या अभिनेत्रीने लपवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : ISRO ने आपल्या गगनयान मोहिमेबाबत मंगळवारी मोठी घोषणा केली. त्यावेळी इस्रोने आपल्या चार अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली. प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशू शुक्ला अशी या चार अंतराळवीरांची नावे आहेत. यातील एका अंतराळवीराची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने आपले लग्न लपवून ठेवल्याची माहिती समोर आली. (Actress Leena) इस्रोने … The post ‘त्या’ अंतराळवीरासोबत लग्न झाल्याची माहिती या अभिनेत्रीने लपवली appeared first on पुढारी.
‘त्या’ अंतराळवीरासोबत लग्न झाल्याची माहिती या अभिनेत्रीने लपवली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ISRO ने आपल्या गगनयान मोहिमेबाबत मंगळवारी मोठी घोषणा केली. त्यावेळी इस्रोने आपल्या चार अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली. प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशू शुक्ला अशी या चार अंतराळवीरांची नावे आहेत. यातील एका अंतराळवीराची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने आपले लग्न लपवून ठेवल्याची माहिती समोर आली. (Actress Leena) इस्रोने घोषणा केल्यानंतर अभिनेत्री लीनाने आपल्या विवाहाची माहिती दिली. (Actress Leena)
अंतराळवीरासोबत मल्याळम अभिनेत्री विवाहबद्ध
अंतराळवीर प्रशांत बालकृष्णन नायर यांच्यासोबत मल्याळम अभिनेत्री लीनाने लग्नगाठ बांधली आहे. मात्र, ही माहिती अभिनेत्रीने आतापर्यंत सांगितली नव्हती. पण, गगनयान मिशनसाठी पंतप्रधानांनी नावांची घोषणा केल्यावर अभिनेत्री लीनाने इन्स्टाग्रावर पोस्ट करत आपले लग्न झाल्याची माहिती दिली. आपला विवाह प्रशांत नायर सोबत झाल्याचे तिने सांगितले. मंगळवारी, २७ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री लीनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये तिने आनंद व्यक्त करत अंतराळवीर प्रशांत नायर यांच्यासोबत लग्न केले असल्याचे म्हटले आहे. १७ जानेवारी रोजी आम्ही विवाबबद्ध झालो. ही गोष्ट मी लपवून ठेवली होती. या संधीचीच वाट पाहत होते, असे तिने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Lenaa ലെന (@lenaasmagazine)

 

View this post on Instagram

 
A post shared by Lenaa ലെന (@lenaasmagazine)

Latest Marathi News ‘त्या’ अंतराळवीरासोबत लग्न झाल्याची माहिती या अभिनेत्रीने लपवली Brought to You By : Bharat Live News Media.