विदर्भात गारपिटीने नुकसान; शेतात आढळली ५० किलोची गार
नागपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा विदर्भात अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. अमरावती, अकोला भागात सलग दोन दिवस पावसाचे असल्याने सिंदखेडराजा, देऊळगाव राजा जळगाव जामोद नांदुरा या तालुक्यात गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर देऊळगाव राजा तालुक्यात तालुक्यात असलेल्या आळंद येथे निबांच्या आकाराच्या गारी पडल्या. त्यामुळे शेड नेट सह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे.
गारांचा पाऊस इतका होता की, काल 15 तासानंतरही गारांचा खच परिसरात कायम होता. त्यामुळे या भागातील पावसाची तीव्रता कशी होते हे दिसते. या गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलोची गार तयार झाली आहे. ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. जिल्ह्यातील 21 हजार 768 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली.
नागपूर – विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध योजनांचे लोकार्पण लोकसभा निवडणूकपूर्व होत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा जोरात सुरू आहे. 2014, 2019 निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? असा सवाल शेतकरी नेत्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :
मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी गरजेची आहे का?: डॉ. बबनराव तायवाडे
मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीनंतर देशात समान नागरी कायदा? अमित शहा यांचे सूचक वक्तव्य
मराठी पाऊल पडते पुढे : माजी न्यायमूर्ती अजय खानविलकर लोकपालपदी नियुक्त
Latest Marathi News विदर्भात गारपिटीने नुकसान; शेतात आढळली ५० किलोची गार Brought to You By : Bharat Live News Media.