तीन दिवसांपासून बेपत्ता मेंढपाळ तरुणाचा आढळला मृतदेह

जळगाव पुढारी वृत्तसेवा – यावल तालुक्यातील साकळीच्या यावल शिवारात असलेल्या शेतात मेंढ पालन करणारा एक गतिमंद असलेला 30 वर्षीय युवक तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर तीन दिवसांनी या तरूणाचा मृतदेह शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल शिवारातील बाळू … The post तीन दिवसांपासून बेपत्ता मेंढपाळ तरुणाचा आढळला मृतदेह appeared first on पुढारी.

तीन दिवसांपासून बेपत्ता मेंढपाळ तरुणाचा आढळला मृतदेह

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा – यावल तालुक्यातील साकळीच्या यावल शिवारात असलेल्या शेतात मेंढ पालन करणारा एक गतिमंद असलेला 30 वर्षीय युवक तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर तीन दिवसांनी या तरूणाचा मृतदेह शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल शिवारातील बाळू वाणी यांच्या शेतात वाघापुर बेहरगाव फाटा तालुका साक्री जिल्हा धुळे येथील राहणार सोनु कोळपे (वय ३० वर्ष राहणार ह. मु. साकळी ता. यावल)  हा तरुण २४ फेब्रुवारी शनिवार पासुन साकळी येथे राहत असलेल्या ठिकाणाहून निघून गेला होता. तीन दिवसांनी (दि. २७) मंगळवार रोजी शेतात सोनु कोळपे हा मृत अवस्थेत मिळून आला. याबाबत मयताचे वडील देविदास तुकाराम कोळपे (वय ६५ वर्ष) राहणार वाघापुर तालुका साक्री यांनी खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास यावलचे प्रभारी अधिकारी हरिष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे.
हेही वाचा :

Dhruv Jurel : ‘पंतचे पुनरागमन होईल;पण ‘हा’ युवा खेळाडू ठरेल धोनीचा वारसदार’
संजय राऊत अब्रुनुकसानीचा खटला; नितेश राणे यांची याचिका निकाली

Latest Marathi News तीन दिवसांपासून बेपत्ता मेंढपाळ तरुणाचा आढळला मृतदेह Brought to You By : Bharat Live News Media.