धक्कादायक ! दगडाने ठेचून खून; व्हिडीओ बनवून दहशत

चाकण : पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन अल्पवयीन मुलांनी एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना चाकण (ता. खेड) येथील चाकण सौंदर्य सोसायटीजवळील भागात सोमवारी (दि. 26) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. मंगळवारी (दि. 27) पहाटे हा प्रकार सोशल मीडियातून समोर आला. धक्कादायक म्हणजे हा निर्घृण प्रकार करणार्‍यांनी हत्येचा आणि त्यानंतर हत्येची माहिती देणारा व्हिडीओ काढून … The post धक्कादायक ! दगडाने ठेचून खून; व्हिडीओ बनवून दहशत appeared first on पुढारी.

धक्कादायक ! दगडाने ठेचून खून; व्हिडीओ बनवून दहशत

चाकण : Bharat Live News Media वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन अल्पवयीन मुलांनी एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना चाकण (ता. खेड) येथील चाकण सौंदर्य सोसायटीजवळील भागात सोमवारी (दि. 26) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. मंगळवारी (दि. 27) पहाटे हा प्रकार सोशल मीडियातून समोर आला. धक्कादायक म्हणजे हा निर्घृण प्रकार करणार्‍यांनी हत्येचा आणि त्यानंतर हत्येची माहिती देणारा व्हिडीओ काढून समाज माध्यमात आणि स्टेटसवर ठेवला आहे. या घटनेने चाकण परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

प्रणव शंकर लोंढे (वय 17, सध्या रा. अमृतनगर, मेदनकरवाडी, ता. खेड; मूळ रा. पारनेर, अहमदनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रघुनाथ मारुती लोंढे (वय 65, रा. मेदनकरवाडी, ता. खेड; मूळ रा. कान्हूरपठार, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  खून करणारी दोन्ही मुले 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील खून करणारा अल्पवयीन आणि प्रणव लोंढे हे एकमेकांचे मित्र होते. त्यांच्यात दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते. त्याच भांडणाचा राग मनात धरून प्रणव यास सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास चाकण-आंबेठाण रस्त्यावरील चाकण सौंदर्य सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत नेले.

तेथेच दोघांनी मिळून प्रणवच्या डोक्यात आणि चेहर्‍यावर दगड घालून त्याला ठार मारले. धक्कादायक म्हणजे या खुनाचे मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर यातील आरोपीने कॅमेर्‍यासमोर येऊन आपण खून केल्याचे सांगितले. त्यानंतर हा व्हिडीओ समाज माध्यमात आणि आरोपींनी आपल्या स्टेटसवर ठेवत दहशतीचा थरार केला. सोशल माध्यमात आणि आरोपींच्या स्टेटसवर ठेवण्यात आलेला हा व्हिडीओ प्रणवच्या काही मित्रांनी प्रणवच्या घरच्यांना दाखविला. त्यानंतर त्यांनी चाकण पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस आणी नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दगडाने चेहरा ठेचलेला प्रणव याचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी तत्काळ यातील दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. चाकण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा

उमेदवार नसलेल्या शिरूरचा अजित पवार करणार दौरा
धुळे : चोरट्यांनी फोडली दानपेटी; गुन्हा दाखल
नाशिक : इंग्रजी पाट्यांविरोधात विशेष मोहीम

Latest Marathi News धक्कादायक ! दगडाने ठेचून खून; व्हिडीओ बनवून दहशत Brought to You By : Bharat Live News Media.