उमेदवार नसलेल्या शिरूरचा अजित पवार करणार दौरा

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेसाठी अद्यापही उमेदवार न सापडलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार 3 मार्चपासून करणार आहेत. या वेळी ते जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह भोसरी आणि हडपसर या सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा, सभा घेणार आहेत. या दौर्‍यात तरी अजित पवार यांना उमेदवार सापडतो का आणि ते महायुतीच्या उमेदवाराची घोषणा आतातरी करणार … The post उमेदवार नसलेल्या शिरूरचा अजित पवार करणार दौरा appeared first on पुढारी.

उमेदवार नसलेल्या शिरूरचा अजित पवार करणार दौरा

शिवनेरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभेसाठी अद्यापही उमेदवार न सापडलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार 3 मार्चपासून करणार आहेत. या वेळी ते जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह भोसरी आणि हडपसर या सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा, सभा घेणार आहेत. या दौर्‍यात तरी अजित पवार यांना उमेदवार सापडतो का आणि ते महायुतीच्या उमेदवाराची घोषणा आतातरी करणार का? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांना द्यायचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शिवसेनेला बहाल करायचा, हेच अद्याप स्पष्ट नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभेवर आपल्याच पक्षाचा दावा केला असला, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदाही याबाबत जाहीर वक्तव्य केले नाही. याउलट महायुतीमध्ये बारामती आणि शिरूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार असल्याचे अजित पवार यांनी यापूर्वीच जाहीरपणे सांगितले आहे. परंतु, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ गेला तर उमेदवार कोण? हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. आता येत्या 3 मार्चपासून अजित पवार शिरूर लोकसभेचा दौरा करून मतदारसंघनिहाय आढावा घेत उमेदवाराची चाचपणी करण्याची शक्यता आहे. 3 तारखेला जुन्नर अथवा खेड तालुका, 4 मार्चला आंबेगाव तालुका, 5 मार्चला खेड-शिरूर असे नियोजन सुरू आहे.
‘पवार विरुद्ध पवार’ लढत होणार
बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील ‘अजित पवार गट विरोधात शरद पवार गट’ अशीच निवडणूक होणार, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून, त्यांनी प्रचार सुरूही केला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचा उमेदवारही अद्याप ठरेना. महायुतीमध्ये उमेदवार निवड करताना भाजपच्या निकषानुसारच तरुण व नवीन चेहरा देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
यामध्ये सध्या भाजपमध्ये असलेले व अजित पवार यांचे विश्वासू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांचे नाव आघाडीवर असून, पूर्वा वळसे पाटील यांना देखील रिंगणात उतरविण्याची चाचपणी होऊ शकते. याशिवाय अजित पवार यांच्याकडून मतदारसंघातील एखादे नवीन तरुण धक्कादायक नाव देखील पुढे आणले जाऊ शकते. यामुळेच आता लवकरच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबतची उत्सुकता पवार यांच्या दौर्‍यानंतर संपुष्टात येईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा

नाशिक : इंग्रजी पाट्यांविरोधात विशेष मोहीम
माजी न्यायमूर्ती अजय खानविलकर लोकपालपदी नियुक्‍त
पदवी, पदव्युत्तर पदवीधारक तृतीयपंथी करणार न्यायदान

Latest Marathi News उमेदवार नसलेल्या शिरूरचा अजित पवार करणार दौरा Brought to You By : Bharat Live News Media.