बैसाणे येथील विश्व कल्याणक मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला
पिंपळनेर, जि.धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील बळसाणे शिवारातील जैन धर्मियांच्या विश्व कल्याणक मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी मंगळवार (दि.27) मध्यरात्रीनंतर फोडली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते.
बळसाणे गावापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या जैन धर्मियांच्या विश्व कल्याणक मंदिरात मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपूर्वी चोरट्यांनी धर्मशाळेच्या मागील बाजुने दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास केली. दुर्दैवाने या मंदिर परिसरातील सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्याने चोरट्यांची करामत कैद होवू शकलेली नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बुधवार (दि.28) सकाळी निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेत दुपारी उशिरापर्यंत याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा:
लोकसभेला महायुतीचे नेते एकत्र; कार्यकर्ते दुरावलेले
नाशिक : इंग्रजी पाट्यांविरोधात विशेष मोहीम
Pooja Sawant Wedding : पूजा सावंतच्या हळद समारंभावेळी बहिण रुचिरा भावूक, मेहंदीचे फोटो व्हायरल
Latest Marathi News बैसाणे येथील विश्व कल्याणक मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला Brought to You By : Bharat Live News Media.