बारामती : ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी लढणार्‍या मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे जोपर्यंत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारी व राजकीय कार्यक्रमांवर समाजाने बहिष्कार टाकावा, असा ठराव बारामतीत सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. येथील जिजाऊ भवन येथे सोमवारी (दि. 26) रात्री समाजाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये पाच ठराव करण्यात आले. त्यात मनोज … The post बारामती : ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार appeared first on पुढारी.

बारामती : ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी लढणार्‍या मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे जोपर्यंत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारी व राजकीय कार्यक्रमांवर समाजाने बहिष्कार टाकावा, असा ठराव बारामतीत सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. येथील जिजाऊ भवन येथे सोमवारी (दि. 26) रात्री समाजाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये पाच ठराव करण्यात आले. त्यात मनोज जरांगे यांच्या पाठीशी मराठा समाज ठामपणे उभा राहील.
जरांगे यांची बदनामी करणार्‍या सरकारचा या वेळी निषेध करण्यात आला. जरांगे यांच्याकडून पुढील आदेश आल्यानंतर त्याची शंभर टक्के अंमलबजावणी बारामती तालुक्यात केली जाईल, सरकारचे मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न पाहता सावधगिरीने आंदोलन पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे सगेसोयरे व ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाने सर्व प्रकारच्या सरकारी व राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा ठराव करण्यात आला.
जरांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून सरकारने जरांगे यांच्याविरुद्ध षडयंत्र रचणार्‍यांचा चेहरा समोर आणावा, अशी मागणी करण्यात आली.
हेही वाच

बंद ‘यशवंत’च्या निवडणुकीत चुरस; बिनविरोधचे प्रयत्न निष्फळ
Drug Case : पश्चिम बंगालहून आणखी एक ताब्यात; धुनियाच्या होता संपर्कात
Potato Milk : बटाट्याचे पौष्टिक दूध; कोलेस्टेरॉल फ्री, हाडांसाठीही लाभदायक

Latest Marathi News बारामती : ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार Brought to You By : Bharat Live News Media.