हिमाचलमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसचे सुक्खू सरकार अडचणीत?; क्रॉस व्होटिंगमुळे भाजप उमेदवार विजयी
Bharat Live News Media ऑनलाईन : राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशात सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. हिमाचलमधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजपच्या हर्ष महाजन यांनी काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३४ मते मिळाली. यावरून काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे दिसते. (Rajya Sabha Election 2024)
राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले. विशेष म्हणजे विधानसभेत काँग्रेसकडे बहुमत असतानाही राज्यसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होट केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सत्ताधारी काँग्रेसने राज्यसभेची एकमेव जागा गमावली. काँग्रेस आमदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हिमाचल प्रदेश विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांसह बुधवारी राजभवनात राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची भेट घेतली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी विधानसभेत बहुमत गमावले असल्याचा दावा करत भाजपने हिमाचल विधानसभेत बहुमत चाचणीची मागणी केली आहे.
राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना जयराम ठाकूर म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले. सत्ताधारी काँग्रेस सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.”
“आम्ही राज्यपालांना विधानसभेत काय घडले याची माहिती दिली आहे. विधानसभेत जेव्हा आम्ही आर्थिक विधेयकादरम्यान मतविभाजनाची मागणी केली, तेव्हा त्याला परवानगी देण्यात आली नाही. सभागृह दोनदा तहकूब करण्यात आले. आमच्या आमदारांशी मार्शलचे वागणे योग्य नव्हते. विधानसभा अध्यक्ष भाजपच्या आमदारांना निलंबित करू शकतात आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या काही आमदारांनाही निलंबित केले जाऊ शकते, अशी आम्हाला शंका आहे. काँग्रेस सरकारने सत्तेत राहण्याचा अधिकार गमावला आहे.”, असे ठाकूर म्हणाले.
काँग्रेसचे ६ आमदार आणि ३ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू सरकार अस्थिर झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेते भूपिंदर सिंह हुडा आणि डीके शिवकुमार यांना नाराज आमदारांशी बोलण्यासाठी पाठवले आहे.
काँग्रेसचे ६ आमदार भाजपच्या संपर्कात?
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर ६ आमदार शिमल्याहून हरियाणाकडे रवाना झाले होते. ते भाजपच्या संपर्कात असल्याचे कळते. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्याची भाजपची योजना असल्याच्या वृत्तांमुळे हिमाचल प्रदेशात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
The post हिमाचलमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसचे सुक्खू सरकार अडचणीत?; क्रॉस व्होटिंगमुळे भाजप उमेदवार विजयी appeared first on Bharat Live News Media.
Home महत्वाची बातमी हिमाचलमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसचे सुक्खू सरकार अडचणीत?; क्रॉस व्होटिंगमुळे भाजप उमेदवार विजयी
हिमाचलमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसचे सुक्खू सरकार अडचणीत?; क्रॉस व्होटिंगमुळे भाजप उमेदवार विजयी
पुढारी ऑनलाईन : राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशात सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. हिमाचलमधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजपच्या हर्ष महाजन यांनी काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३४ मते मिळाली. यावरून काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे दिसते. (Rajya Sabha Election 2024) राज्यसभेच्या एकमेव …
The post हिमाचलमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसचे सुक्खू सरकार अडचणीत?; क्रॉस व्होटिंगमुळे भाजप उमेदवार विजयी appeared first on पुढारी.