बाहुली, रेटिना असलेला कृत्रिम डोळा!
लंडन : संशोधकांकडून प्रयोगशाळेत मानवी अवयवांचीही नक्कल करून काही कृत्रिम अवयव बनवण्याचे प्रयत्न होत असतात. ब्रिटनमध्ये तर चक्क कृत्रिम डोळाही बनवण्यात आला होता हे तुम्हाला माहिती आहे का? लंडन विद्यापीठातील संशोधकांनी हा बाहुली, रेटिना असलेला कृत्रिम डोळा बनवला होता. डोळ्यांशी संबंधित विविध प्रकारच्या संशोधनासाठी असा कृत्रिम डोळा उपयूक्त ठरू शकतो.
हा कृत्रिम डोळा मानवी नैसर्गिक डोळ्याप्रमाणे काम करू शकतो. या थ्रीडी मिनी आयला रेटिनल ऑर्गेनॉयड्स असे म्हटले गेले आहे. हा कृत्रिम डोळा बनवण्यासाठी मानवी त्वचेचा वापर करण्यात आला आहे. याआधी कृत्रिम डोळा तयार करण्यासाठी प्राण्यांच्या पेशींवर संशोधन केले गेले होते, पण याचे चांगले परिणाम मिळाले नाहीत. आता मानवी त्वचेपासून तयार करण्यात आलेल्या मिनी आयमधून अनेक गोष्टी शोधल्या जाऊ शकतात.
एखाद्या व्यक्तीची पाहण्याची क्षमता कशी जाते, हे शोधण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. याशिवाय डोळ्यांशी संबंधित अनुवंशिक आजारांसंदर्भात संशोधन सुरू आहे. यामुळे भविष्यात डोळ्यांसंबंधीच्या आजारांवरील उपचारात मदत होऊ शकेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मिनी आयवरील संशोधनामुळे वयाच्या पन्वनाशीनंतर होणार्या मॅक्युलर डिजेनेरेशनवर उपाय शोधण्यात मदत होईल. मॅक्युलर डिजेनेरेशन आजारामध्ये डोळ्यांची द़ृष्टी कालांतराने कमी होऊ लागते.
Latest Marathi News बाहुली, रेटिना असलेला कृत्रिम डोळा! Brought to You By : Bharat Live News Media.