गुजरातच्या पोरबंदरमध्ये मोठी कारवाई, ३,३०० किलो ड्रग्जसह ५ जणांना अटक
Bharat Live News Media ऑनलाईन : गुजरातमधील पोरबंदर येथे एटीएस, एनसीबी आणि भारतीय तटरक्षक दलाने एक संयुक्त मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत इराणी आणि पाकिस्तानी असल्याचा संशय असलेल्या ५ क्रू मेंबर्सना ३,३०० किलो ड्रग्जसह अटक केली आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात हजारो कोटी रुपये किंमत आहे.
समुद्रातील केलेल्या या संयुक्त कारवाईत, भारतीय नौदलाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या समन्वयाने सुमारे ३,३०० किलो कॉन्ट्राबँड (३,०८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन, २५ किलो मॉर्फिन) घेऊन जाणारी एक संशयित बोट पकडली. पाळत ठेवणाऱ्या P8I LRMR विमानाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तैनात केलेले जहाज अवैध मालाच्या तस्करीचा संशय असलेली बोट थांबवण्यासाठी वळवण्यात आले. या कारवाईदरम्यान जप्त केलेला ड्रग्जसाठा आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे.
एनसीबीसह भारतीय नौदलाने केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेली बोट आणि खलाशी आणि ड्रग्जसाठा भारतीय बंदरात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या संबंधित एजन्सीकडे सोपवण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.
In a successful coordinated operation at sea, Indian Navy in coordination with the Narcotics Control Bureau apprehended a suspicious dhow carrying almost 3300 Kg contraband (3089 Kg Charas, 158 Kgs Methamphetamine 25 Kg Morphine). Based on the input of P8I LRMR aircraft on… pic.twitter.com/h9vKc90554
— ANI (@ANI) February 28, 2024
Latest Marathi News गुजरातच्या पोरबंदरमध्ये मोठी कारवाई, ३,३०० किलो ड्रग्जसह ५ जणांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.