मालीमध्ये भीषण बस अपघात; ३१ जण ठार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पश्चिम आफ्रिकन देश माली येथे मंगळवारी भीषण बस अपघात झाला. मालीच्या पश्चिमेकडील केनिबा शहराजवळ नदीच्या पुलावरून बस कोसळून ३१ जणांचा मृत्यू झाला, असे परिवहन मंत्रालयाने सांगितले. (Mali Bus Accident)
या अपघातातील मृतांमध्ये पश्चिम आफ्रिकन उपप्रदेशातील मालियन आणि इतर ठिकाणच्या नागरिकांचाही समावेश आहे. परिवहन मंत्रालयाने सांगितले की, बस बुर्किना फासोला जात होती. नदीपुलाजवळ आले असता बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलावरून नदीत कोसळली. (Mali Bus Accident)
हेही वाचा :
इस्रायल – हमासमध्ये तोडगा दृष्टिपथात; सोमवारपर्यंत युद्धविराम शक्य – ज्यो बायडेन
बुर्किना फासो येथील चर्चमध्ये गोळीबार; १५ कॅथलिक उपासकांचा मृत्यू
पाकिस्तानमधील पंजाब प्रातांच्या मुख्यमंत्रीपदी शरीफांची कन्या मरियम
Latest Marathi News मालीमध्ये भीषण बस अपघात; ३१ जण ठार Brought to You By : Bharat Live News Media.