जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. (Today Horoscope) मेष : श्रीगणेश म्हणतात की, आज प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही संयमाने स्‍वत:ला रचनात्मक कार्यात … The post जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. (Today Horoscope)
मेष : श्रीगणेश म्हणतात की, आज प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही संयमाने स्‍वत:ला रचनात्मक कार्यात व्यस्त ठेवाल. जोखमीच्या कामात पैसे गुंतवण्याआधी संपूर्ण माहिती घेवूनच निर्णय घ्‍या. व्यवसायातील कठीण कामांचा पुन्हा विचार करावा लागेल. अहंकारामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढू शकतात. आरोग्य चांगले राहिल.
वृषभ : आज सकारात्मक विचारांच्‍या व्यक्तीसोबत विचारांची देवाणघेवाण झाल्‍याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्‍या उपजत प्रतिभेला चालना दिल्‍यास तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीची थोडी चिंता राहील. मात्र लवकरच सर्व काही ठीक होईल. वादापासून लांब राहा. व्यवसायाशी निगडीत कामात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल, असे श्रीगणेश सांगतात.
मिथुन : आज विद्यार्थी आणि तरुणांनी ताणतणावपासून लांब राहावे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. मालमत्तेसंबंधी वाद सोडवता येईल. अनावश्यक खर्च टाळता येईल. आरोग्यासह व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी थोडा वेळ द्या. घरातील वातावरण आनंददायी ठेवा. आरोग्य चांगले राहिल.
कर्क : आज आळस आणि निराशेपासून दूर राहा. कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता तुमची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणू शकाल, असे श्रीगणेश म्‍हणतात. तुमच्या भावनांचा आणि उदारतेचा फायदा घेऊ शकते. ॲसिडीटीचा त्रास होण्‍याची शक्‍यता. (Today Horoscope)
सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात वेळ व्‍यतित करा. घरगुती देखभाल आणि साफसफाईच्या कामांमध्ये व्यस्त राहाल. एखादे ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. कोणतीही अशुभ सूचना मिळाल्यानेही अशांतता आणि तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायिक कामे सामान्य राहतील.
कन्या : आज घरातील वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन घ्‍या. तरुणांना करिअरशी संबंधित काम पूर्ण झाल्‍याने दिलासा मिळेल. संपूर्ण माहिती घेतल्‍याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. मानसिक शांतता अनुभवण्यासाठी ध्यानाची मदत घेणे योग्य ठरेल, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
तूळ : आज रखडलेल्या कामांना गती मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. गरजूंना मदत केल्यास मानसिक शांतता लाभेल. कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका. अन्‍यथा निराशा जाणवेल. पती-पत्नी योग्य सामंजस्य राखतील. पोटाशी संबंधित काही समस्या जाणवू शकते. (Today Horoscope)
वृश्चिक : तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. घरातील ज्येष्ठांचा स्नेह आणि आशीर्वाद असेल. कामाचा अति ताण टाळा. काळ थोडा प्रतिकूल आहे. प्रेमसंबंधांना कौटुंबिक मान्यता मिळाल्याने मन प्रसन्न राहू शकते. आरोग्य चांगले राहील, असे श्रीगणेश सांगतात.
धनु : श्रीगणेश म्हणतात की, आज आर्थिक बाबतीत योग्य आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. कामाची जबाबदारी वाढेल;पण त्याचबरोबर यशही मिळेल. अनेक कामांमध्ये नशीब तुमची साथ देईल. दिवसभर जास्त काम करूनही तुम्ही कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहिल.
मकर : खूप दिवसांनी एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन अधिक प्रसन्न होईल, असे श्रीगणेश सांगतात. जवळच्या नातेवाईकाची समस्या सोडवण्यातही तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकता. अतिआत्मविश्वास लांब राहा. व्यवसायाशी संबंधित कामांकडे दुर्लक्ष करु नका. कोणताही जुना आजार पुन्हा होण्याची समस्या असू शकते.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, कौटुंबिक मतभेद चर्चा करून सोडवले जाऊ शकतात. तुमच्या कामांचे कौतुक होईल. भावनिकदृष्ट्या तुम्हाला उत्साही वाटेल. व्यवसायात कोणताही ठोस निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागेल. वाईट संगत टाळा.
मीन : आज कोणताही निर्णय घेतलाना भावनेऐवजी तुमची बुद्धिमत्ता आणि चातुर्य वापरा. तरुणांनाही त्यांच्या कार्यात यश मिळवण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तीची मदत मिळू शकते. मानसिक शांततेसाठी अध्यात्माची किंवा ध्यानाची मदत घेतली पाहिजे. घरातील ज्‍येष्‍ठांच्‍या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता.
Latest Marathi News जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? Brought to You By : Bharat Live News Media.