एस टी कामगारांचे उपोषण मागे; उद्योगमंत्री सामंत यांच्या महागाई भत्ता वाढीच्या आश्वासनानंतर निर्णय
मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : गेले पंधरा दिवस मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने आपल्या न्याय्य आर्थिक मागण्यांवर उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महागाई भत्ता ४२ टक्यावरून वरून ४६ टक्के यासह इतर काही मागण्या मान्य केल्यानंतर हे उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले.
प्रथम चार दिवस विभागीय पातळीवर, त्यानंतर आझाद मैदान मुंबई येथे हे आंदोलन सुरू होते. शासनाच्या वतीने मंगळवारी (दि २७) संघटनेसमवेत मंत्रालय मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही बैठक घेतली. या बैठकीला अतिरीक्त मुख्य सचीव परिवहन संजय शेठी, महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधवजी कुसेकर, परिवहन १ चे जॅाईन्ट सेक्रेटरी होळकर, वित्तीय सल्लागार मा गिरीश देशमुख, विधी सल्लागार अजय नाथानी, कक्ष अधिकारी सारीका मेंढे , महामंडळाचे सर्व खाते प्रमुख, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनावडेकर, इत्यादी अधीकारी उपस्थित होते.
शासनाने विनंतीनंतर संघटनेने उपोषण तात्पुरते स्थगीत केले असून जर मुदतीमध्ये मागण्यांची पुर्तता शासन प्रशासनाने केल्या नाही काम आंदोलन करणार इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
बैठकीत खालील मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले
महागाई भत्ता ४२ टक्यावरून वरून ४६ टक्के करण्याचे मान्य करण्यात आले.
मुळवेतनातील रू पाच, चार व अडीच हजार मुळे होणा-या तफावतीमुळे सरसकट रू पाच हजार देण्याचे तत्वता मान्य करण्यात आले.
महागाई भत्ता , घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर याचा फरक देण्याचे मान्य करण्यात आले
Latest Marathi News एस टी कामगारांचे उपोषण मागे; उद्योगमंत्री सामंत यांच्या महागाई भत्ता वाढीच्या आश्वासनानंतर निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.