पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ
मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्ला जूनमध्ये सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांचा चार महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. मात्र, त्याआधीच त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. रश्मी शुक्ला आता जानेवारी २०२६ पर्यंत राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर राहणार आहेत.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविण्यात येत होती. अखेर त्यांना दोन वर्षाचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भात नोटिफिकेशन काढून ही महीती दिली.
रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आल्या होत्या. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, पुढे न्यायालयाने त्यांना क्लिन चिट दिली. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना मुदतवाढ मिळाल्याने त्या जानेवारी २०२६ पर्यंत राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर राहणार आहेत.
Latest Marathi News पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ Brought to You By : Bharat Live News Media.