अंतरिम अर्थसंकल्प हा केवळ आश्वासनाचा पाऊस : अनिल देशमुख
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : आज सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प हा केवळ आश्वासनाचा पाऊसच असल्याचा आरोप माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
वन्य प्राण्यापासून शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेमध्ये निधी देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु याचा लाभ हा केवळ बफर झोन एरियातच होणार आहे. इतर जंगलाच्या भोवती वन्य प्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना त्याच्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. शेतकरी आज अडचणीत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने नुकसान होऊन देखील मदत मिळत नाही. एक रुपया पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना झाल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना पिक विम्याची कोणतीही मदत मिळाली नाही. एकूणच या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या तसेच उद्योजक, व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम झाल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
Latest Marathi News अंतरिम अर्थसंकल्प हा केवळ आश्वासनाचा पाऊस : अनिल देशमुख Brought to You By : Bharat Live News Media.