बागल गटाच्या नेत्या रश्मी बागलसह दिग्विजय बागल यांचा भाजपमध्ये प्रवेश
करमाळा; Bharat Live News Media वृत्तसेवा : बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल कोलते व दिग्विजय बागल यांनी आज (दि. २७) सायंकाळी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आदि पदाधिकारी ही उपस्थित होते.
यावेळी प्रवेश करताना रश्मी बागल कोलते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शेकडो समर्थकांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा गमजा देत त्यांना भाजपा मध्ये प्रवेश दिला.
यावेळी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, मकाई कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर, आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, आदिनाथ कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन नानासाहेब लोकरे, मकाई कारखान्याचे संचालक सतीश नीळ, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, मार्केट कमिटीचे संचालक काशिनाथ काकडे, मकाई कारखान्याचे संचालक आशिष गायकवाड, मकाई कारखान्याचे संचालक अनिल अनारसे, पुण्याचे विष्णू गर्जे,कलीम काझी सर, व्यापारी रितेश कटारिया, पोथरेचे नानासाहेब शिंदे, करमाळ्यातील आनंदराव कांबळे व विकास भोसले आदिसह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या बहुचर्चित कृषी महोत्सवापासून बागल गट भाजपमध्ये प्रवेश करणार याची सर्वत्र चर्चा चालू होती. कृषी महोत्सवानिमित्त भाजपमधील दिग्गज पदाधिकारीनी कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्याचवेळी रश्मी बागल कोलते व दिग्विजय बागल हे समर्थकासह भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता निर्माण झाली होती. आदिनाथ व मकाईमध्ये आलेल्या आर्थिक अडचणीत भाजपचेच मंत्रिमंडळ मदत करतील व आधीच आदिनाथ व मकाई मध्ये बॅक फुटला गेलेल्या बागल गटाला याचा निश्चितच फायदा होईल अशी चर्चा चालू होती. मात्र बागल गटांनी यामध्ये ठोस भूमिका घेतली नाही किंवा भाजपमध्ये प्रवेश देण्यापासून त्यांना कोणीतरी रोखल्याची शक्यता चर्चिली जात होती. भाजप प्रवेशासाठी बागल गटाला योग्य वेळ नसल्याचे सांगितले जात होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वीच बागल गटाचा भाजपमध्ये प्रवेश होईल असेही बोलले जात होते ती शक्यता आज खरी ठरली आहे. आजही आदिनाथ व मकाई हे दोन्ही बागल गटाच्या हातातील कारखाने सध्या आर्थिक विवंचनेत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी बागल गटांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले होते मात्र विरोधकांनी त्यांना चांगलेच कोंडीत पकडले होते त्यामुळेही त्यांना यश आले नाही .आता भाजपमध्ये प्रवेश केल्यावर आदिनाथ मकाई चा यक्ष प्रश्न सुटणार का?शेतक-यांची रखडले ली बिले मिळणार का?आदिनाथ चे वैभव पुन्हा प्राप्त होणार का असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत.
Latest Marathi News बागल गटाच्या नेत्या रश्मी बागलसह दिग्विजय बागल यांचा भाजपमध्ये प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.