मराठी भाषेसाठीच हट्ट ठेवा : राज ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी भाषा दिवस आज (दि.२७) महाराष्टभर साजरा होत आहे. याआधी मराठी भाषा दिवस हा कुसुमाग्राजाचा जन्मदिवस म्हणून एक तारीख म्हणून होता, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २००७ साली मराठी भाषा दिवस साजरा करायला सुरूवात केली. त्यानंतर मराठी भाषा दिवस साजरा होऊ लागला. असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. मराठी भाषा दिनानिमित्त एका … The post मराठी भाषेसाठीच हट्ट ठेवा : राज ठाकरे appeared first on पुढारी.

मराठी भाषेसाठीच हट्ट ठेवा : राज ठाकरे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठी भाषा दिवस आज (दि.२७) महाराष्टभर साजरा होत आहे. याआधी मराठी भाषा दिवस हा कुसुमाग्राजाचा जन्मदिवस म्हणून एक तारीख म्हणून होता, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २००७ साली मराठी भाषा दिवस साजरा करायला सुरूवात केली. त्यानंतर मराठी भाषा दिवस साजरा होऊ लागला. असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. मराठी भाषा दिनानिमित्त एका कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले. मराठी भाषेचा दिवस दुसऱ्या कोणत्याही राज्यात साजरा होत नाही. महाराष्ट्रामध्ये जसं मराठी साहित्य संमेलन होत. इतर कोणत्याही राज्यात साहित्य संमेलन होत नाही, कदाचित केरळ किवा बंगालमध्ये होत असेल. महाराष्ट्र यासाठी पहिल्यापासून पुढारलेला आहे. महाराष्ट्राकडे इतिहासाबरोबर भुगोलही आहे, असेही ते म्हणाले.
दक्षिणेतील लोकांना हिंदी येत असूनही त्यांचा हट्ट असतो की, माझ्या भाषेत चित्रपट आला तरच मी बघेन. आपण आपल्या भाषेसाठी हट्ट केला पाहिजे. रविंद्रनाथ टागोर यांना मैग्सेसे आवार्ड मिळाला आहे. तो खूप मोठा आवार्ड आहे. रविंद्रनाथ टागोर यांचे सर्व साहित्य बंगालीत आहे. त्यांच सर्व साहित्य बंगालीत असूनही जगाने त्यांची दखल घेतली. ही माणसे आपल्या भाषेपासून दुर गेली नाहीत त्यांनी आपल्या भाषेजवळ जगाला आणलं, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा :

जरांगे यांच्या आंदोनस्थळावरील मंडप हटवणार असल्याच्या चर्चांना उधाण
मराठा आंदोलनकर्ते आणि सरकारमधील संघर्षावर ओबीसी नेते तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
Ashish Deshmukh : आता मनोज जरांगेंचे मास्टर माईंड समोर येतील: डॉ. आशिष देशमुख

Latest Marathi News मराठी भाषेसाठीच हट्ट ठेवा : राज ठाकरे Brought to You By : Bharat Live News Media.