कोल्हापूर : चंदगडमध्ये उसने दिलेल्या पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने सोनाराचा खून

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : उसने दिलेले पैसे परत केले नसल्याच्या रागातून बाळकृष्ण अनंत सोनार ( सध्या रा.तुडये, मूळ गाव कालकुंद्री ता. चंदगड, जि. कोल्हापूर वय ६० ) यांची धारदार विळ्याने सपासप वार करून हत्या केली. संशयित आरोपी रमेश बाबू पाटील ( वय ४५ रा. तुडये ता. चंदगड ) याला चंदगड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. बाळकृष्ण … The post कोल्हापूर : चंदगडमध्ये उसने दिलेल्या पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने सोनाराचा खून appeared first on पुढारी.

कोल्हापूर : चंदगडमध्ये उसने दिलेल्या पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने सोनाराचा खून

चंदगड; Bharat Live News Media वृत्तसेवा : उसने दिलेले पैसे परत केले नसल्याच्या रागातून बाळकृष्ण अनंत सोनार ( सध्या रा.तुडये, मूळ गाव कालकुंद्री ता. चंदगड, जि. कोल्हापूर वय ६० ) यांची धारदार विळ्याने सपासप वार करून हत्या केली. संशयित आरोपी रमेश बाबू पाटील ( वय ४५ रा. तुडये ता. चंदगड ) याला चंदगड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
बाळकृष्ण सोनार हे सोने चांदीचे खरेदी, विक्रीचे व्यापारी आहेत. गावागावात फिरून ते सोने चांदीची विक्री करतात. व्यवसायाच्या भांडवलाकरिता रमेश बाबू पाटील याने बाळकृष्ण सोनार यांना काही दिवसांपूर्वी १ लाख ३० हजार रुपये उसने दिले होते. अनेक वेळा पैशासाठी तगादा लावूनही सोनार याने पैसे दिले नाहीत.
दरम्यान आज मंगळवारी दुपारी १ वाजता धामणे – कर्नाटक हद्दीतून स्वप्नवेल पॉईंटकडे जाणाऱ्या डोंगरात मोटरसायकल वरून रमेश याने बाळकृष्णला नेले. व मध्यस्थामार्फत आपला प्रश्न सोडवूया असे खोटे बोलून त्याला स्वप्नवेल पॉईंट कडे नेले. त्यानंतर घनदाट जंगलात त्याच्यावर विळ्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये बाळकृष्ण गंभीर जखमी अवस्थेत पडले. घाबरलेल्या रमेशने घराकडे पलायन केले. जखमी अवस्थेत असलेल्या बाळकृष्ण यांनी आपल्या मोबाईलवरून चंदगड पोलिसांना ही माहिती दिली. आपण कुठे आहोत याची माहिती दिल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आणि दुसरे पथक रमेश याला पकडण्यासाठी तुडये येथे दाखल झाले. रक्ताने माखलेले कपडे धुत असताना रमेश याला पोलिसांनी अटक केली.
Latest Marathi News कोल्हापूर : चंदगडमध्ये उसने दिलेल्या पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने सोनाराचा खून Brought to You By : Bharat Live News Media.