चांदवडला मध्यरात्री तीन दुकाने फोडली, पाच लाखांचा ऐवज लंपास
चांदवड : Bharat Live News Media वृत्तसेवा- चांदवड मार्केट यार्ड मधील व्यापारी संकुलातील तीन दुकाने मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडत तब्बल ४ लाख ७१ हजार ८५० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
चोरट्यांनी अक्षय सोनवणे यांचे कुरियर सर्व्हिस ऑफिसमधून १ लाख ५८ हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही, डी. व्ही. आर, प्रिंटर, , वजनकाटा तसेच २३० वेगवेगळे कुरियर पार्सल नेले. सुमित खुटे यांच्या हायड्रोलिक दुकानातून १ लाख ७३ हजार ८५० रुपये किंमतीचे सीसीटीव्ही डीव्हीआर, स्क्रीन, १ लाख २२ हजार ८५० रुपये किंमतीचे ५० ऑईल ड्रम, ५० हजार रुपयांचे जेसीबीचे स्पेअरपार्ट तर कुलदीपसिंग बेदी यांच्या श्री गुरुनानक ऑटो इलेक्ट्रीक वर्क्स दुकानातून १ लाख ४० हजार रुपयांचे बॅटऱ्या, वाइंडिग आर्मेचर, अल्टरनेटर रोटर, कॉइल व ट्रक स्टार्टर चोरले. या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. यावेळी नाशिक येथून श्वानपथक, हाताचे ठसे तज्ञ यांना बोलवण्यात आले होते. या घटनेबाबत अक्षय राजेंद्र सोनवणे (२७) याने चांदवड पोलिसात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा :
Jalgaon Hailstorm : 215 गावांना गारपिटीचा फटका, 18 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Rajinikanth : बिग न्यूज- रजनीकांत साजिद नाडियादवाला यांच्यासोबत करणार काम
Latest Marathi News चांदवडला मध्यरात्री तीन दुकाने फोडली, पाच लाखांचा ऐवज लंपास Brought to You By : Bharat Live News Media.