5 जणांनी घरात शिरून केला महिलेचा विनयभंग
नाशिक : वाहन रस्त्यावर लावण्याच्या कारणातून पाच जणांनी महिलेच्या घरात शिरून तिस मारहाण, शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना बजरंगवाडी परिसरात घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.२५) सायंकाळी पाचच्या सुमारास संशयित इमरान शेख, नवाज खान, शिरीन खान, मुन्नी शेख, हसन खान यांनी घरात शिरून मारहाण व विनयभंग केला. तसेच घरातील साहित्याची मोडतोड केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धमकावत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नाशिक : अल्पवयीन मुलीस धमकावत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्याविरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित सुर्यभान गोडे (रा. ता. अकोले, जि. अहमदनगर) याने फेब्रुवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत अकोले येथे वारंवार पाठलाग करीत, छेडछाड, मारहाण करीत धमकावले. तसेच जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पाेलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
Yashasvi Jaiswal : जैस्वाल 800 चा टप्पा गाठणार? ‘पहिला’ भारतीय फलंदाज बनण्याची संधी
Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक २०२४ : वारे कोणत्या दिशेने वाहतेय?; जाणून घ्या केंद्र, राज्यातील ट्रेंड
कोल्हापूर : हुपरीत भरधाव ट्रॅक्टर दुकानात घुसला; तरुणांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली
Latest Marathi News 5 जणांनी घरात शिरून केला महिलेचा विनयभंग Brought to You By : Bharat Live News Media.