रत्नागिरी : कॉलेज तरुणीला ओढून गाडीत खेचण्याचा ट्रकचालकाचा प्रयत्न

खेड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी मंगळवारी (दि. 21) सायंकाळी वेरळ गावात कॉलेजमधून घरी जाणार्‍या तरुणीला ट्रकचालकाने गाडीत खेचण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुलीने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाल्याने ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यावेळी ट्रकमध्ये खेचताना तरुणी जखमी झाल्याचे समजते. मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ … The post रत्नागिरी : कॉलेज तरुणीला ओढून गाडीत खेचण्याचा ट्रकचालकाचा प्रयत्न appeared first on पुढारी.

रत्नागिरी : कॉलेज तरुणीला ओढून गाडीत खेचण्याचा ट्रकचालकाचा प्रयत्न

खेड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी मंगळवारी (दि. 21) सायंकाळी वेरळ गावात कॉलेजमधून घरी जाणार्‍या तरुणीला ट्रकचालकाने गाडीत खेचण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुलीने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाल्याने ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यावेळी ट्रकमध्ये खेचताना तरुणी जखमी झाल्याचे समजते. मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ गावानजीक भोस्ते घाटाच्या पायथ्याशी मंगळवार, दि.21 रोजी सायंकाळी भरदिवसा ही धक्कादायक घटना घडली.
कॉलेजमधून घरी चालत जाणार्‍या तरुणीला एका ट्रक चालकाने तिच्या जवळ ट्रक थांबवून तिला ट्रकमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरुणीच्या मानेला आणि गळ्याला दुखापत झाली. यावेळी तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावून आले. त्या नंतर त्या ट्रक चालकाने ट्रक त्या ठिकाणीच सोडून घटनास्थळाहून पोबारा केल. वेरळ गावातील ग्रामस्थांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पळून गेलेल्या त्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत असून, रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

The post रत्नागिरी : कॉलेज तरुणीला ओढून गाडीत खेचण्याचा ट्रकचालकाचा प्रयत्न appeared first on पुढारी.

खेड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी मंगळवारी (दि. 21) सायंकाळी वेरळ गावात कॉलेजमधून घरी जाणार्‍या तरुणीला ट्रकचालकाने गाडीत खेचण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुलीने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाल्याने ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यावेळी ट्रकमध्ये खेचताना तरुणी जखमी झाल्याचे समजते. मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ …

The post रत्नागिरी : कॉलेज तरुणीला ओढून गाडीत खेचण्याचा ट्रकचालकाचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Go to Source