शाहीरी बाणा, लावणीचा ठेका अन् हास्य कल्लोळाने महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात
धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- शाहीरी बाणा, लावणीचा ठेका, शहनाई तबला जुगलबंदीसह, सांस्कृतिक नृत्य आणि हास्याच्या कल्लोळात महासंस्कृती महोत्सवाला आज धुळे जिल्ह्यात प्रारंभ झाला. अवघ्या धुळेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या महोत्सवाचा आनंद लुटला.
धुळे महासंस्कृती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपवनसरंक्षक नितीनकुमार सिंग, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपायुक्त संगीता नांदुरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व धुळेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर.के. शहनाई ग्रुप, धुळे, राकेश गुरव व सहकारी यांनी शास्त्रीय वाद्याची शहनाई तबला जुगलबंदी सादर केली. तर सांगलीचे शाहीर पृथ्वीराज माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सादर केलेल्या पोवाड्याने, आकांक्षा कदम यांच्या लावणीच्या ठेक्यांवर प्रत्येक पावलाने प्रेक्षकांची मने जिंकली. तर महाराष्ट्राची हास्यजत्रेत प्रभाकर मोरे, प्रथमेश शिवलकर, यांनी शोले पिक्चरावर सादर केलेल्या जय विरु भूमिका तर प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवानी परब, पृथ्वी प्रताप, अभिजित कोसंबी, श्रावणी महाजन, आकांक्षा कदम, परेश दाभोळकर आणि गोकुळ पाटील यांच्या प्रहसनाच्या हास्याच्या कल्लोळाने अवघे धुळेकरांना मंत्रमुग्ध केलेत.
महासंस्कृती महोत्सवातील उद्याचे कार्यक्रम
बुधवार, 28 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजता ‘जागर लोककलेचा’ तथागत हा कार्यक्रम गौतमबुद्ध बहुउद्देशिय संस्था, धुळे हे सादर करतील. सकाळी 10.30 ते 11.30 वाजता ‘अंगणी पारिजात फुलला’ हा कार्यक्रम पारिजात चव्हाण व सहकारी, धुळे हे सादर करतील. सकाळी 11.30 ते 12.30 वाजता ‘मारुतीची जत्रा (बाल नाट्य )’ अनुभूती इंग्लिश मेडियम स्कुल, जळगाव हे सादर करतील. दुपारी 12.30 ते 1 वाजता चोपडा येथील दिनेश साळुंखे ‘बाहुल्यांचे विश्व (कट पूतली)’ हा कार्यक्रम सादर करतील.
सायंकाळी 5 ते 6.30 वाजता ‘राइझिंग स्टार रॉक बॅण्ड’ हा कार्यक्रम अजिंक्य बगदे व सहकारी, धुळे हे सादर करतील. सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजता ‘खान्देशी बाणा (गीत, गायन व नृत्य)’ हा कार्यक्रम लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, धुळे सादर करतील. सायंकाळी 7.30 ते रात्री 10 वाजता ‘वारी सोहळा संतांचा’ हा कार्यक्रम प्रो. इव्हेटिस, मुंबई, ओमकार वसुधा अशोक सावंत हे सादर करतील.
या कार्यक्रमांना धुळे जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
हेही वाचा :
Dhule News : बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर
Nashik Shodh Mahaveg : एमसीए घेणार ‘शोध महावेगाचा’, राज्यात पाच ठिकाणी आयोजन
Maharashtra budget 2024-25 : कोल्हापूर, सांगली महापूर नियंत्रणासाठी अंतरिम अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Latest Marathi News शाहीरी बाणा, लावणीचा ठेका अन् हास्य कल्लोळाने महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात Brought to You By : Bharat Live News Media.