नांदगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

नांदगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा –  नांदगाव तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळवारे व विजेच्या कडकडाटासह बे मोसमी पावसाने हजेरी लावली. गारपीटही झाली. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची शेतात असलेला शेतमाल झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती. तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी सायंकाळी पावसाने अल्पशी हजेरी देखील लावली होती. परंतु आज … The post नांदगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी appeared first on पुढारी.

नांदगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

नांदगाव(जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा –  नांदगाव तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळवारे व विजेच्या कडकडाटासह बे मोसमी पावसाने हजेरी लावली. गारपीटही झाली. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची शेतात असलेला शेतमाल झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती.
तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी सायंकाळी पावसाने अल्पशी हजेरी देखील लावली होती.
परंतु आज मंगळवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाबरोबरच गारा देखील मोठ्या प्रमाणात पडल्या तसेच या पावसामुळे शेतात पाणी साचले होते.
हवेत गारवा
गेल्या काही दिवसांपासून, वातावरणात तापमानाची वाढ झाली होती. यामुळे उष्णतेत देखील वाढ झाली होती. पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
हेही वाचा :

Neha Pendse : ‘मे आय कम इन मॅडम?’ फेम नेहा पेंडसे ओटीटीमध्ये पदार्पण करणार?
Maharashtra Budget 2024 : सर्वसमावेशक, सर्वांना न्याय देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Film Terav : “तेरव” एकल महिलेच्या संघर्षावरील चित्रपट

Latest Marathi News नांदगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी Brought to You By : Bharat Live News Media.