पारू : मी पहिल्याच दिवशी ‘अहिल्या’च्या प्रेमात पडले – मुग्धा कर्णिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मालिकांमध्ये भिन्न-भिन्न पात्रे असतात. काहींच्या प्रेमात तुम्ही लगेच पडता तर काही पात्राना समजून घ्यायला आणि स्विकारायला वेळ लागतो आणि तसेच एक पात्र ‘पारू’ ह्या नवीन मालिकेत आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर जिचा पहिलाच प्रोमो चर्चेचा विषय ठरला. अहिल्याची भूमिका ‘मुग्धा कर्णिक’ साकारत आहेत. मुग्धाने तिच्या भावना व्यक्त केल्या. ही भूमिका साकारत असताना तिली … The post पारू : मी पहिल्याच दिवशी ‘अहिल्या’च्या प्रेमात पडले – मुग्धा कर्णिक appeared first on पुढारी.
पारू : मी पहिल्याच दिवशी ‘अहिल्या’च्या प्रेमात पडले – मुग्धा कर्णिक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मालिकांमध्ये भिन्न-भिन्न पात्रे असतात. काहींच्या प्रेमात तुम्ही लगेच पडता तर काही पात्राना समजून घ्यायला आणि स्विकारायला वेळ लागतो आणि तसेच एक पात्र ‘पारू’ ह्या नवीन मालिकेत आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर जिचा पहिलाच प्रोमो चर्चेचा विषय ठरला. अहिल्याची भूमिका ‘मुग्धा कर्णिक’ साकारत आहेत. मुग्धाने तिच्या भावना व्यक्त केल्या. ही भूमिका साकारत असताना तिली काय वाटले, याबद्दल सांगितले.
मुग्धा म्हणते- मी माझ्या आयुष्यात कधीच अशी भूमिका केली नाहीये. जेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्वापेक्षा वेगळं काही करतो तेव्हा एक आव्हान असत, मला ऑडिशनलाच इतकी मज्जा येत होती, त्यासोबत काहीतरी नवीन शिकायला आणि करायला मिळणार याची उत्सुकता पण होती. अहिल्या नेहमी सत्याच्या बाजूने उभी असते, खोटं तिला सहन होत नाही. शून्यातून तिने आपलं साम्राज्य निर्माण केलं आहे, हालाखीचा काळ तिने पाहिला आहे ज्यामुळे ती अशी आहे. तिचं तिच्या दोनी मुलांवर खूप प्रेम आहे पण ते व्यक्तकरण्याची पद्धत वेगळी आहे. ती खूप कमी शब्दात बोलते पण ज्या प्रकारे बोलते ते बघण्यासारखं आहे.

माझ्यासाठी एका आईची भूमिका निभावणं हेच मुळात नवीन आहे तेही इतक्या मोठ्या मुलांची. पण आमच्या मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत सर कमाल आहेत ज्या प्रकारे ते मार्गदर्शन करतात आणि आमच्याकडून गोष्टी करून घेतात हे खूप शिकण्यासारखं आहे. सुरवातीला थोडा संकोच होता की इतक्या मोठ्या मुलांची आई कशी निभावणार पण जेव्हा अहिल्याला जाणून घेतलं तेव्हा मी तिच्या प्रेमात पडले. मी स्वतःला नेहमी सेट वर आठवण करून देते की मी दोन मोठ्या मुलांची आईची भूमिका साकारत आहे, असेही तिने सांगितले.
कधी-कधी नकळत आपल्या हावभावांमध्ये दिसून येतं तर त्यागोष्टीची मी अतिशय काळजी घेते. जेव्हा पहिल्याच पहिला प्रोमो आला त्यारात्री मी उशिरा पर्यंत जागी होती इतके फोन येतं होते मला, सोशल मीडियावर मेसेजसची उत्तरं देता देता घड्याळकडे लक्षच नाही गेले. पण खूप छान प्रतिसाद मिळतोय त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद, असे तिने नमूद केले.
‘पारू’ सोमवार ते शनिवार संध्या ७:३० वाजता झी मराठीवर पाहता येईल.
Latest Marathi News पारू : मी पहिल्याच दिवशी ‘अहिल्या’च्या प्रेमात पडले – मुग्धा कर्णिक Brought to You By : Bharat Live News Media.