‘मे आय कम इन मॅडम?’ फेम नेहा पेंडसे ओटीटीमध्ये पदार्पण करणार?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘मे आय कम इन मॅडम?’ मधून जिने या इंडस्ट्रीत पदार्पण केलं अशी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे आणि ‘भाभी जी घर पर है’ मधील तिच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. पण तिच्या अनोख्या फॅशन शैलीसाठी नेहा कायम चर्चेत असते. (Neha Pendse) वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री आता ती लवकरच OTT स्पेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. (Neha Pendse)
नेहाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केलं तर आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने बॉलीवूड आणि टेलिव्हिजनमध्येही ठसा उमटवला आहे. आता नेहा ओटीटी स्पेसमध्ये प्रवेश करणार का? याची सगळेच उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सूत्रानुसार, नेहाच्या चमकदार कामगिरीमुळे आता ती OTT विश्वात मोठी झेप घेऊन एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. तिचे चाहते यासाठी उत्सुक तर आहेत. पण नेहा काय भूमिका साकारणार हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.
‘मे आय कम इन मॅडम?’ आणि ‘भाभी जी घर पर है’ साठी मिळालेल्या उत्तुंग यशामुळे आणि प्रतिसादामुळे नेहा पेंडसेचे टेलिव्हिजनवरून ओटीटी स्पेसमध्ये होणारी एंट्री नक्कीच उल्लेखनीय असणार आहे. ‘मे आय कम इन मॅडम?’ च्या सीझन 2 मध्ये शेवटची दिसलेली अभिनेत्री आता तिच्या आगामी प्रोजेक्ट साठी तयारी करत असून लवकरच ती नव्या प्रोजेक्ट बद्दल घोषणा करणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)
Latest Marathi News ‘मे आय कम इन मॅडम?’ फेम नेहा पेंडसे ओटीटीमध्ये पदार्पण करणार? Brought to You By : Bharat Live News Media.