संभाजी पगारे यांना पिंपळनेर रत्न पुरस्कार प्रदान

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा- समाजात राहून जो आपल्या लोकांसाठी काम करतो व केलेल्या कामावर निष्ठा ठेवतो अशा समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीची दखल समाज घेतो, असे समाजसेवेचे व्रत घेऊन इतर क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल कवी ऍड. संभाजी पगारे यांना हा पिंपळनेरत्न पुरस्कार मिळाला असल्याचे गौरवोद्गार खासदार हीना गावित यांनी काढले. कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा अध्यक्षस्थानी … The post संभाजी पगारे यांना पिंपळनेर रत्न पुरस्कार प्रदान appeared first on पुढारी.

संभाजी पगारे यांना पिंपळनेर रत्न पुरस्कार प्रदान

पिंपळनेर; Bharat Live News Media वृत्तसेवा- समाजात राहून जो आपल्या लोकांसाठी काम करतो व केलेल्या कामावर निष्ठा ठेवतो अशा समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीची दखल समाज घेतो, असे समाजसेवेचे व्रत घेऊन इतर क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल कवी ऍड. संभाजी पगारे यांना हा पिंपळनेरत्न पुरस्कार मिळाला असल्याचे गौरवोद्गार खासदार हीना गावित यांनी काढले. कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा अध्यक्षस्थानी होते. पिंपळनेर येथील कविवर्य ऍड. संभाजी पगारे यांना स्व. पुंडलिक संपत चौधरी पिंपळनेर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. शहरातील साई कृष्णा लॉन्स मध्ये हा सोहळा पार पडला. खासदार हिना गावित यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन पगारे यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, सभापती हर्षवर्धन दहिते, जि.प सदस्या सुधामती गांगुर्डे, धनराज विसपुते, वसंतराव बच्छाव, रामकृष्ण खलाणे, इंजि मोहनराव सूर्यवंशी, चंद्रजीत पाटील, भीम सिंग राजपूत, प्रदीप कोठावदे, भाऊसाहेब देसले, गोकुळ परदेशी, विजय भोसले, गजेंद्र भोसले, शिरीष सोनवणे, संजय बोरसे, उपसरपंच विजय गांगुर्डे, संग्राम पाटील, साहेबराव नंदन, इंजि. के.टी सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना संजय शर्मा म्हणाले की ऍड. संभाजी पगारे म्हणजे शांत संयमी, विनय व विनम्रता व्यक्तिमत्व अशा गुणांनी युक्त असलेले स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व होय. योग्य व्यक्तीला मिळालेला पुरस्कार योग्य व्यक्तीच्या हस्ते मिळाला याचाही आनंद व्यक्त करताना मीना गावित यांच्या कार्याचाही या ठिकाणी उल्लेख केला.
प्रमुख वक्ते म्हणून शकील अहमद आपल्या भाषणात म्हणाले, की संभाजीराव पगारे हे पक्षाचे एकनिष्ठ असून त्यांची राजकीय, सामाजिक शैक्षणिक कारकीर्द अतिशय स्वच्छ आहे. अशा या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर यांच्या कार्याचा वसा घेतलेल्या संभाजीराव पगारे यांना पिंपळनेर रत्न सारखा पुरस्कार मिळाला ही त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी पुरस्कार म्हणून उत्तर देताना संभाजीराव पगारे म्हणाले, की सामान्य कुटुंबातून परिवारातून आहे. मी काही केलेल्या कामाचे पावती म्हणून मला हा पुरस्कार मिळाला असला तरी हा पुरस्कार माझ्या सामान्य नागरिकांना व माझ्या गावातील जनतेला अर्पण करतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमात संयोजन कमिटी सदस्य सतीश पाटील, पांडुरंग सूर्यवंशी, राजेंद्र गवळी, उदय बिरारी, विशाल गांगुर्डे, विष्णू जिरे पाटील, विजयराव सोनवणे, नितीन कोतकर, पुरस्कार संयोजक भगवान बागुल, सुभाष जगताप, भरत बागुल, ज्ञानेश्वर एखंडे, रिखबशेठ जैन, दिलीप बधान, पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, प्रा.सविता पगारे, मिलिंद महाजन, भालचंद्र ततार, मोहमदी पिंपळनेरवाला, फक्रीभाई पिंपळनेरवाला, सामाजिक सेवा पुरस्कार प्राप्त वसंत घरटे, शामकांत पगारे, जनादॅन नगरकर, प्रताप पाटील, श्याम पाटील, प्रा.किरण कोठावदे, दिलीप बधान, शामकांत कोठावदे, प्रा.डॉ प्रतिभा चौरे श, किरण कोठावदे, अनिल शिंदे, हंसराज शिंदे, भिलाजी जिरे, मुख्याध्यापक शांताराम मोरे, राजेंद्र शिरसाट, स्वप्निल पगारे, छाया पगारे, देवेंद्र कोठावदे, मोतीलाल पोतदार, सुदाम पगारे, अमृत घरटे, संस्थेचे संचालक मुकेश गांगुर्डे, विठ्ठल पगारे, भाजपाचे शहराध्यक्ष डाॅ.राजेंद्र पगारे, मंडळ अध्यक्ष विकी कोकणी, दिलीप घरटे, चंद्रकांत घरटे, यांच्यासह गावातील अनेक क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी कवी साहेबराव नंदन, शिक्षक रवींद्र पगारे, चि.सोनवणे, उपशिक्षिका आशा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सविता पगारे व उमेश माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर अकलाडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थेतील कुसुंबा, मैदाने, सामोड व पिंपळनेर या आश्रम शाळेतील व माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील विविध व्यक्तींकडून संभाजीराव पगारे यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
हेही वाचा :

शेतकऱ्यांसोबत व्यवहार कसा करावा हे केंद्र सरकारने फ्रान्सकडून शिकावं : काँग्रेसची टीका
Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ७३ हजारांवर, निफ्टी २२,२०० जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

Latest Marathi News संभाजी पगारे यांना पिंपळनेर रत्न पुरस्कार प्रदान Brought to You By : Bharat Live News Media.