लोकसभा निवडणूक : ‘आप’ने दिल्ली-हरियाणातील उमेदवारांची केली घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत झालेल्‍या जागावाटपानंतर आज (दि.२७) आम आदमी पार्टीने (आप) उमेदवारांची नावे जाहीर केली. दिल्लीतील चार आणि हरियाणातील एका जागेसाठी पक्षाने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आपचे नेते आणि दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी पक्षाच्या मुख्यालयातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तत्‍पूर्वी पक्षाच्‍या राजकीय व्यवहार समितीची बैठक झाली. … The post लोकसभा निवडणूक : ‘आप’ने दिल्ली-हरियाणातील उमेदवारांची केली घोषणा appeared first on पुढारी.
लोकसभा निवडणूक : ‘आप’ने दिल्ली-हरियाणातील उमेदवारांची केली घोषणा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत झालेल्‍या जागावाटपानंतर आज (दि.२७) आम आदमी पार्टीने (आप) उमेदवारांची नावे जाहीर केली. दिल्लीतील चार आणि हरियाणातील एका जागेसाठी पक्षाने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
आपचे नेते आणि दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी पक्षाच्या मुख्यालयातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तत्‍पूर्वी पक्षाच्‍या राजकीय व्यवहार समितीची बैठक झाली. यानंतर पक्षाने दिल्ली आणि हरियाणामधील उमेदवारांची नावे जाहीर केली.
आपचे तीन आमदार लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उमेदवार पुढील प्रमाणे कंसात मतदार संघाचे नाव : कुलदीप कुमार ( पूर्व दिल्ली ), सोमनाथ भारती (नवी दिल्ली), महाबल मिश्रा (पश्चिम दिल्ली) , साहिरम (दक्षिण दिल्ली) तर हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघासाठी सुशील गुप्ता यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आप आणि काँग्रेसची युती झाली आहे. आप दिल्लीत चार जागांवर निवडणूक लढवणार आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र लोकसभेची जागा तिच्या वाट्याला आली आहे, तर पंजाबच्या सर्व 13 जागांवर ती निवडणूक लढवत आहे. आप दिल्लीतील दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली आणि नवी दिल्ली या जागांवर निवडणूक लढवणार आहे.

AAP announces Lok Sabha candidates for four seats in Delhi, one in Haryana
Read @ANI Story | https://t.co/hVI5L6dnXT#AAP #LokSabhaElections2024 #AamAadmiParty pic.twitter.com/HygtzCmqHs
— ANI Digital (@ani_digital) February 27, 2024

हेही वाचा : 

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक २०२४ : वारे कोणत्या दिशेने वाहतेय?; जाणून घ्या केंद्र, राज्यातील ट्रेंड
आगामी लाेकसभा निवडणुकीत भाजपला कोण पराभूत करेल? प्रशांत किशोर म्‍हणाले,”तिसरी आणि चौथी आघाडी…”

Latest Marathi News लोकसभा निवडणूक : ‘आप’ने दिल्ली-हरियाणातील उमेदवारांची केली घोषणा Brought to You By : Bharat Live News Media.