कोल्हापूर : हुपरीत भरधाव ट्रॅक्टर दुकानात घुसला; तरुणांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली
हुपरी: Bharat Live News Media वृत्तसेवा : हुपरी येथील टेकडीवरून भरधाव आलेली टॅक्टर ट्रॉली थेट मेन रोड लगतच्या एका दुकानात घुसली. ट्रॅक्टर इतका भरधाव होता की, चार फुटाचा कट्टा चढून दुकानात घुसला. याठिकाणी असलेले ६ ते ७ जण प्रसंगावधान राखत बाजूला पळाले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना आज (दि.२७) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. नागरिकांनी ट्रॅक्टरच्या चालकाला चोप दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी ऊस कारखान्यावर घालून ट्रॅक्टर (mxh 4025) जात होताय. यावेळी पैशाफंड बँकेजवळील घसरणीला ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. मात्र, मागे दोन मोठ्या ट्रॉल्या असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. आणि ट्रॅक्टर अंबाबाई मंदिर कमानीजवळ असणाऱ्या सुकुमार बेडगे यांच्या इमारतीच्या तळ मजल्यावर असणाऱ्या सुमीत वॉच अँड गिफ्ट या दुकानात ट्रॅक्टर घुसला. येथे किराणा दुकानही आहे. त्यामुळे गर्दी होती.
तरुणांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड करत बाजूला होत इतरांनाही बाजूला केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तर दुकानात असणारे मालक पाटील यांनाही कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, दुकानाचे व इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. एक कॉलम निखळण्याची शक्यता असल्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला आहे.
ही घटना घडताच चालक पळून गेला. तर दुसरा एक जण नागरिकांच्या ताब्यात सापडला. त्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर दुकान मालक पाटील भयभीत झाल्याने चक्कर येऊन पडले. घटनास्थळी हुपरी पोलीस दाखल झाले.
हेही वाचा
Maharashtra budget 2024-25 : कोल्हापूर, सांगली महापूर नियंत्रणासाठी अंतरिम अर्थसंकल्पात मोठी घोषणा
कोल्हापूर : यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट
कोल्हापूर : सराफावर हल्ला करून लुटणार्या म्होरक्यासह सहाजण गजाआड
Latest Marathi News कोल्हापूर : हुपरीत भरधाव ट्रॅक्टर दुकानात घुसला; तरुणांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली Brought to You By : Bharat Live News Media.