Lenovo ने सादर केला जगातील पहिला पारदर्शक लॅपटॉप!
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lenovo Transparent Display Laptop : स्पेनच्या बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024 (MWC 2024) धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी लेनोवोने (Lenovo) पहिला पारदर्शक लॅपटॉप सादर करून जगाला चकित केले. हा लॅपटॉप 17.3 इंचाच्या बेझल लेस डिस्प्लेसह येतो, जो 55 टक्के पारदर्शकता प्रदान करतो. याचा अर्थ तुम्ही डिस्प्लेमधून आरपार पाहू शकता. हा लॅपटॉप केवळ पारदर्शक नाही तर अत्याधुनिक आहे. त्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
मायक्रो एलईडी (LED) स्क्रीन : लॅपटॉपमध्ये 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह मायक्रो-एलईडी स्क्रीन आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस 1000 निट्स आहे.
AIGC : आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेनरेटेड सामग्रीचा लॅपटॉपमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही सुविधा वापरकर्त्यांना सर्वोत्तम अनुभव प्रदान करते.
पारदर्शक कीबोर्ड पॅनेल : या लॅपटॉपमध्ये लेसर-प्रोजेक्टेड की-बोर्ड देण्यात आला आहे. ज्याचे फ्लोटिंग फूटपॅड डिझाइन आहे. याचा स्केचपॅड म्हणून देखील वापर होऊ शकतो.
AI-कॅमेरा: लेनोवोच्या अत्याधुनिक लॅपटॉपमधील कॅमेरा चेसिसच्या वर स्थापित करण्यात आला आहे. हा कॅमेरा AI चा वापर करून इमेज रेकग्निशन करतो.
या लॅपटॉपमध्ये Windows 11 OS वापरण्यात येत आहे.
हा लॅपटॉप अजूनही एक संकल्पना आहे आणि अद्याप खरेदीसाठी उपलब्ध नाही. लेनोवोने अद्याप या लॅपटॉपची किंमत आणि उपलब्धता जाहीर केलेली नाही. हा लॅपटॉप तंत्रज्ञानाच्या जगात नक्कीच खळबळ उडवून देईल. कंपनीने अद्याप त्याच्या हार्डवेअरबद्दल अधिक माहिती शेअर केलेली नाही.
Crystal-clear creativity: the Lenovo ThinkBook Transparent Display Concept is the industry’s first laptop with a 17.3-inch Micro-LED transparent display.
A truly immersive creative experience unlike any other!
Learn more: https://t.co/wMU4JsXGIq | #LenovoMWC #MWC24
— Lenovo (@Lenovo) February 26, 2024
Latest Marathi News Lenovo ने सादर केला जगातील पहिला पारदर्शक लॅपटॉप! Brought to You By : Bharat Live News Media.