ठाणे: १ कोटी ८३ लाखांचे अमली पदार्थ जप्त; चार जणांना अटक
ठाणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ठाण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अमली पदार्थ विक्री करणाऱ्या रिषभ संजय भालेराव (वय 28, शहापूर, जिल्हा ठाणे) या तस्करास 7 फेब्रुवारी 2024 रोजी अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणी अभिजित अविनाश भोईर (29, खर्डी, शहापूर, जिल्हा ठाणे), पराग नारायण रेवंडकर (31, नवापाडा, डोंबिवली), मामा उर्फ सुरेंद्र बाबुराव अहिरे (54) आणि राजू हरिभाऊ जाधव (40) या आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 83 लाख 34 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. Thane News
वागळे स्टेट परिसरातील इंदिरानगर येथे ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकाने रिषभ भालेराव या अमली पदार्थ तस्करास अटक केली होती. त्याच्या ताब्यातून 31 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले होते. दरम्यान, पुढील तपासात आरोपी रिषभ यास ड्रग्ज पुरवणाऱ्या आणखी काही जणांची नावे समोर आली. त्यानुसार अभिजित अविनाश भोईर, पराग नारायण रेवंडकर, या दोघांना 20 फेब्रुवारी रोजी अटक केली. या दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी 1 लाख 46 हजार रुपये किमतीचे चरस व गांजा अमली पदार्थ जप्त केले. Thane News
तर मामा उर्फ सुरेंद्र बाबुराव अहिरे आणि राजू हरिभाऊ जाधव या दोघांना 23 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी मनमाड येथून अटक केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल 1 किलो 507 ग्रॅम हॅश हे ड्रग्ज जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची एकूण किंमत 1 कोटी 83 लाख 34 हजार 980 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा
ठाणे : रास्तारोको करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
ठाणे लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र फाटक? भाजपचे वाढले टेन्शन
ठाणे : 24 कोटींच्या जमिनीसाठी झाला गोळीबार; 15 दिवसांपूर्वी जागामालकाने महेश गायकवाडांकडे मागितली होती दाद
Latest Marathi News ठाणे: १ कोटी ८३ लाखांचे अमली पदार्थ जप्त; चार जणांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.