प्रस्तावित चेन्नई-सुरत, पुणे-संभाजीनगर महामार्ग जिल्ह्याची लाईफलाईन

नगर : पुढारी वृत्तसेवा : प्रस्तावित सुरत-चेन्नई आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्ग नगर जिल्ह्यातून जाणार असल्याने हे रस्ते नगरचे भविष्य बदलवतील. नगर जिल्ह्यात 12 हजार रुपये कोटी रुपयांचे विविध महामार्गाचे कामे सुरू असून त्यातील 11 कामे पूर्ण झाली तर 9 प्रगतीपथावर आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर नगर जिल्ह्यातील रस्त्यांची तुलना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री … The post प्रस्तावित चेन्नई-सुरत, पुणे-संभाजीनगर महामार्ग जिल्ह्याची लाईफलाईन appeared first on पुढारी.

प्रस्तावित चेन्नई-सुरत, पुणे-संभाजीनगर महामार्ग जिल्ह्याची लाईफलाईन

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रस्तावित सुरत-चेन्नई आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्ग नगर जिल्ह्यातून जाणार असल्याने हे रस्ते नगरचे भविष्य बदलवतील. नगर जिल्ह्यात 12 हजार रुपये कोटी रुपयांचे विविध महामार्गाचे कामे सुरू असून त्यातील 11 कामे पूर्ण झाली तर 9 प्रगतीपथावर आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर नगर जिल्ह्यातील रस्त्यांची तुलना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी थेट अमेरिकेशी केली. एक तासात नगर-पुणे, दोन तासात पुणे-छत्रपती संभाजीनगर तर साडेचार तासात पुणे-नागपूर असा रोडमॅप मंत्री गडकरी यांनी मांडला.
अहमदनगर बाह्यवळण रस्ता, अहमदनगर- मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी पॅकेज (एक) अहमदनगर ते घोगरगाव, व पॅकेज (दोन) घोगरगाव ते चापडगाव रस्त्यांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आ. राम शिंदे, आ.बबनराव पाचपुते, आ.मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, भाजपचे कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड, अक्षय कर्डिले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, प्रांताधिकारी सुधीर पाटील उपस्थित होते.
मंत्री गडकरी म्हणाले, पूर्वी नगर कृषी क्षेत्रात अग्रेसर होता, आता वॉटर, पॉवर आणि ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशनमुळे जिल्ह्याला दिशा मिळाली आहे. जिल्ह्यात 2014 पूर्वी केवळ 202 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग होता. आता एक हजार 71 किलोमीटरचा झाला आहे. त्यासाठी 12 हजार कोटींची निधी उपलब्ध करून दिला. वीस पैंकी 11 कामे पूर्ण झाली असून, 9 कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे चित्र बदलत आहे. आढळगाव ते जामखेड रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर, नगर ते पाथर्डी रस्ता प्रगतिपथावर आहे. नगर-दौंड रस्त्यासाठी 100 कोटी रुपये मंजूर केले आहेत. नगर-निर्मलमधून सीना नदीवरील पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नगर ते खरंवडी कासार रस्त्याची निविदास्तरावर आहे. नगर-दौंड ते वासुंदे रस्त्यासाठी हजार कोटी रुपये मंजूर केले असून, लवकरच काम सुरू होणार आहे.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर महत्त्वाचा रस्ता आहे. आता पुण्यात प्लायओव्हर तयार करण्यात आले आहेत. पुण्यातील फ्लायओव्हर थेट शिरूरपर्यंत करण्यात येणार आहे. तर, पुणे नगर छत्रपती संभाजीनगर असा नवीन महामार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर अंतर दोन तासात पूर्ण होईल. तर, पुणे ते नागपूर साडेचार तासांत अंतर पार होईल, असे गडकरी म्हणाले.
सुरत ते चेन्नई हा महामार्ग नगर जिल्ह्याचे भविष्य बदलविणारा ठरणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. उत्तर भारतातून येणारी वाहने दक्षिण भारतात जाणार आहेत. ग्रामीण भागाला शेतीबरोबर उद्योग व्यवसायाला चालणार मिळणार आहे. यापुढे आता चेन्नईला जाण्यासाठी सोलापूर, कोल्हापूर, पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. नगर, बीड, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे संजय जैस्वाल यांनी प्रास्ताविक केले. डी. एस. झोडगे यांनी आभार मानले.
नवीन 1420 कोटींच्या रस्त्यांना मान्यता
400 कोटी रुपये किंमतीचा माळशेज घाट, आणेघाट, अहमदनगर बायपास, खरवडी कासार जंक्शन सिमेंट काँक्रिटीकरण, 670 कोटी रुपयांच्या अहमदनगर ते सबलखेड, आष्टी व चिंचपूर तसेच 350 कोटी रुपयांचा नांदूर शिंगोटे ते कोल्हार या नवीन रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
शेतकरी ऊर्जा दाता बनणार
आता शेतकर्‍यांच्या शेतीपासून इथोनॉल निर्मिती होते. तर, इथेनॉलनपासून हवाई इंधन बनविण्यात येणार आहे. त्यामुळे येणार्‍या काळात शेतकर्‍यांना चांगले दिवस येतील. शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जा दाता बनला पाहिजे, असेही ते म्हणाले.
गडकरींचे योगदान न विसरणारे : खा. विखे
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मला पाच वर्षे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. मंत्री गडकरी नसते तर मी जनतेला काहीच देऊ शकलो नसतो. त्याचे हे योगदान येणार्‍या अनेक पिढ्या विसरणार नाहीत. आता जिल्ह्यातील तरुण चांगले स्वप्न पाहू शकतील. नगरचा विकास अविरित सुरू राहील, असा आशावाद खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.
हेही वाचा

ग्रामसभेने निवडलेल्या समितीस परवानगी : निद्रिस्त गणपती यात्रोत्सव सुरू
Sai Tamhankar : सईच्या अभिनयाची भूमी पेडणेकरला पडली भुरळ 
श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघ; अध्यक्षपदी बापूसाहेब गायकवाड

Latest Marathi News प्रस्तावित चेन्नई-सुरत, पुणे-संभाजीनगर महामार्ग जिल्ह्याची लाईफलाईन Brought to You By : Bharat Live News Media.