Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडला धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नरने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याने आपल्या 12 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अचानक संपवून क्रिकेटप्रेमींना धक्का दिला आहे. गेल्या आठवड्यात प्रशिक्षक गॅरी स्टेड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर नील वॅग्नरने हा निर्णय घेतला आहे. मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असलेल्या नील वॅग्नरने 2012 मध्ये न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने 64 कसोटी सामन्यात 260 विकेट घेतल्या. वेलिंग्टन येथे सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत त्याने निवृत्तीची घोषणा केली. ( Neil Wagner)
नील वॅग्नरने निवृत्तीचा निर्णय का घेतला?
न्यूझीलंडच्या निवड समितीने आगामी कसोटी मालिकेत प्लेइंग 11 चा भाग नसल्याची माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर वॅगनरने हा निर्णय घेतला. तो म्हणाला, “कधी ना कधी ही वेळ येणार आहे, हे मला माहीत होते. गेल्या आठवड्यात भविष्याचा विचार करत मी निवृत्तीचा निर्णय घेतला.” ( Neil Wagner)
न्यूझीलंडचे प्रशिक्षक स्टेड म्हणाले की, वॅग्नरला आधीच कळवण्यात आले होते की. त्याला कसोटी मालिकेचा भाग बनवले जाणार नाही.नीलने न्यूझीलंडसाठी वेळ दिल्याबद्दल त्याचे खूप आभारी आहोत. वॅग्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो देशांतर्गत क्रिकेट खेळत राहणार आहे.
नील वॅग्नरची कारकीर्द
नील वॅग्नर याने आपल्या कारकिर्दीची सुरूवात 2006 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्यापासून केली. न्यूझीलंडसाठी 64 कसोटी खेळणाऱ्या वॅगनरच्या नावावर 27.57 च्या सरासरीने 260 बळी घेण्याचा विक्रम आहे. 100 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांमध्ये सर रिचर्ड हॅडलीनंतरचा त्याचा स्ट्राइक रेट 52.7 हा सर्वोच्च आहे.
आठवणींना उजाळा
निवृत्तीची घोषणा करताना नील वॅग्नरने कसोटी क्रिकेटमधील आठवणींना उजाळा दिला. 2014 मध्ये भारताविरुद्धचा पहिला कसोटी विजय, 2014 मध्ये न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजविरुद्धचा मालिका विजय, 2018 मध्ये इंग्लंडविरुद्धचा मालिका विजय, भारतावरचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजय. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या एका धावेने मिळवलेल्या विजयाचे स्मरण त्याने केले. कारकिर्दीत पाठिंबा दिल्याबद्दल कुटुंब, मित्र, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचेही त्याने आभार मानले. नील वॅग्नरने न्यूझीलंडसाठी भाग घेतलेल्या 64 कसोटी सामन्यांपैकी संघाने 32 जिंकले आहेत. ज्यामध्ये त्याने 22 च्या सरासरीने 143 बळी घेतले आहेत.
The very proud owner of New Zealand Men’s Test cap #256! Read more | https://t.co/dNwndRo0R0 #ThanksWags pic.twitter.com/ngN1TnW62s
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 27, 2024
हेही वाचा :
नाशिकमध्ये उद्यापासून पाच दिवस महासंस्कृती महोत्सव, विनाशुल्क मिळणार सांस्कृतिक मेजवानी
अकोला : चिमुकल्याचे दुसऱ्यांदा अपहरण करण्याचा प्रयत्न: संशयितावर गुन्हा दाखल
एक्स्प्रेस थांब्याकरीता भिगवणला रास्ता रोको
Latest Marathi News ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी न्यूझीलंडला धक्का; ‘या’ दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला रामराम Brought to You By : Bharat Live News Media.