
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंगळवारी गगनयान मोहिमेतील चार अंतराळवीरांना समोर आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२७) केरळमधील तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला (VSSC) भेट दिली. यादरम्यान कार्यक्रमात त्यांनी गगनयानातील चार अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली. पीएम मोदींच्या हस्ते गगनयान मोहिमेचे प्रशिक्षण घेतलेल्या चार अंतराळवीरांना पंख प्रदान करत त्यांना या मोहिमेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जाणून घेऊया भारताच्या गगनयान मोहिमेतील कोण आहेत ‘हे’ चार भारतीय यांच्याविषयी… (Gaganyaan Mission Astronauts)
प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला हे चार अंतराळवीर आहेत. जे भारताच्या गगनयान या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी प्रशिक्षण घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२७) केली. चार वर्षांपूर्वी शॉर्ट-लिस्ट केलेले हे चौघे अतराळवीर बंगळूरमधील एअरक्राफ्ट अँड सिस्टीम्स टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंटचे (ASTE) भारतीय वायुसेनेचे (IAF) चाचणी वैमानिक आहेत. (Gaganyaan Mission Astronauts)
गगनयान मोहीमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांना भारतातील सर्व प्रकारच्या लढाऊ विमानांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. त्यामुळे लढाऊ विमानांच्या उणिवा आणि खासियत त्यांना माहीत आहेत. या सर्वांना रशियातील जिओग्नी शहरात असलेल्या रशियन स्पेस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या हे सर्वजण बंगळूर येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत, असेदेखील इस्रोने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
#ISRO reveals the identities of the four astronaut designates for #Gaganyaan‘s first crewed mission! 👨🚀
• Group Captain Prashanth BalaKrishnan Nair
• Group Captain Ajit Krishnan
• Group Captain Angad Prathap
• Wing Commander Shubhansku Shukla
🇮🇳🇮🇳🇮🇳pic.twitter.com/08bLavQxBT
— ISRO Spaceflight (@ISROSpaceflight) February 27, 2024
Gaganyaan Mission Astronauts : ‘हे’ आहेत गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीर
प्रशांत बालकृष्णन नायर : ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे केरळचे रहिवासी आहेत, ज्यांना मानव अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी रशियामध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. मल्याळम दैनिक मातृभूमीच्या वृत्तानुसार, त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून पदवी प्राप्त केली आणि 1999 मध्ये ते कमिशन्ड ऑफिसर म्हणून हवाई दलात सामील झाले. ते सुखोई युद्ध विमाने उडवणारे लढाऊ वैमानिक आहेत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
इतर स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये प्रशांत बालकृष्णन नायर हे मूळचे पलक्कडचे रहिवासी आहेत ज्यांनी अलाबामा येथील यूएस एअर कमांड अँड स्टाफ कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने पदवी प्राप्त केली आहे. रशियामध्ये प्रशिक्षणासोबतच त्यांनी बंगळूरच्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्येही प्रशिक्षण घेतले आहे, असे अहवालात म्हटले आहे. (Gaganyaan Mission Astronauts)
It is reported that Group Captain Prahsanth Balakrishnan Nair, a Su-30MKI pilot will be the mission commander for the first flight, with one other Vyomnaut tagging along in the cockpit. pic.twitter.com/5kZQi87ymr
— ISRO Spaceflight (@ISROSpaceflight) February 27, 2024
अजित कृष्णन : ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन हे मिशनचा भाग होण्यासाठी निवडलेल्या चार जणांपैकी आहेत. अहवालानुसार, चार क्रू मेंबर्सपैकी तीन जणांना अंतराळ मोहिमेवर जाण्यासाठी निवडले जाईल.
अंगद प्रताप : ISRO ने दिलेल्या माहितीनुसार, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांनी ग्रुपच्या इतर तीन सदस्यांसोबत 13 महिने रशियामध्ये प्रशिक्षण घेतले आहे.
शुभांशु शुक्ला : विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांनाही मॉस्कोच्या युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळ मोहिमेविषयी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
काय आहे भारताची ‘गगनयान’ मोहीम
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून ‘गगनयान’ मोहीम 2025 मध्ये प्रक्षेपित केली जाईल. या अंतर्गत 400 किलोमीटरच्या निम्न कक्षेत दोन ते तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवले जाईल. दोन ते तीन दिवस अंतराळात घालवल्यानंतर त्यांना पुन्हा हिंद महासागरात सुरक्षितपणे समुद्रात उतरवले जाईल. या मोहिमेसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असून या वर्षात मोहिमेशी संबंधित अनेक चाचणी, उड्डाणे इस्रो यावर्षभरात पूर्ण करणार आहे.
हेही वाचा:
ISRO Gaganyaan Mission: PM माेदींनी केली ‘अंतराळ’वारी करणार्या भारतीयांची घाेषणा
ISRO Inaugurates Projects : ISRO ला मिळणार बूस्ट; PM मोदींकडून अंतराळ प्रक्षेपणाला चालना देणारे ३ प्रकल्प राष्ट्राला समर्पित
Gaganyaan Mission | गगनयान मोहिमेबाबत ISRO ने दिली महत्त्वाची अपडेट, CE20 इंजिनच्या सर्व चाचण्या यशस्वी
Gaganyaan Mission : मानवाला अंतराळात घेऊन जाणार्या इंजिनची चाचणी यशस्वी
Gaganyaan Mission | ‘गगनयान’ मोहिमेचा भारताला काय होईल फायदा?; जाणून घ्या मोहिमेविषयी
The post ‘हे’ ४ भारतीय करणार अंतराळवारी; जाणून घ्या त्यांच्याविषयी appeared first on Bharat Live News Media.
