आंदोलनात सहभागी एकाचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये ठिय्या देणाऱ्या आंदोलकांपैकी एकाचा सोमवारी (दि. २६) सायंकाळी मृत्यू झाला. भाऊसाहेब बाबुराव गवे (६५, रा. कसबे सुकेणे) असे मृत्यू झालेल्या आंदोलकाचे नाव आहे. आंदोलनात सहभागी असताना सायंकाळच्या सुमारास भाऊसाहेब यांना जिल्हा न्यायालयासमोर भोवळ आली. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचाराआधी त्यांचा मृत्यू झाला … The post आंदोलनात सहभागी एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

आंदोलनात सहभागी एकाचा मृत्यू

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये ठिय्या देणाऱ्या आंदोलकांपैकी एकाचा सोमवारी (दि. २६) सायंकाळी मृत्यू झाला. भाऊसाहेब बाबुराव गवे (६५, रा. कसबे सुकेणे) असे मृत्यू झालेल्या आंदोलकाचे नाव आहे. आंदोलनात सहभागी असताना सायंकाळच्या सुमारास भाऊसाहेब यांना जिल्हा न्यायालयासमोर भोवळ आली. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचाराआधी त्यांचा मृत्यू झाला होता.
सोमवारी सायंकाळी आंदोलनात सहभागी असताना भाऊसाहेब यांना चक्कर येऊन खाली पडले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता. त्यानुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हृदयविकार, अशक्तपणामुळे भाऊसाहेब यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. भाऊसाहेब गवे हे त्यांच्या कुटुंबातील चौघांसोबत दोन दिवसांपूर्वी कसबे सुकेणे येथून नाशिकला येण्यासाठी आंदोलनात सहभागी झाला होते.
आंदोलकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार
जिल्हा शासकीय रुग्णालयात सायंकाळी पाचनंतर आंदोलकांपैकी पाच जणांना दाखल केले. मळमळ, उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा या स्वरुपाच्या तक्रारी आंदोलकांनी केल्या. अनेकजण सकाळी केवळ भात, पोळी-भाजी खाऊन मोर्चात सहभागी झाल्याचे समजते. त्यामुळे काही आंदोलकांना अशक्तपणा जाणवत असल्याच्या तक्रारी होत्या. सायंकाळी पाचनंतर आंदोलनस्थळी पाण्याचे टँकर पाठविण्यात आले होते.
हेही वाचा :

वाशिम: कारंजा, मंगरूळपीर तालुक्यात गारपिटीने पिके भुईसपाट, पक्ष्यांचा मृत्यू
रायगड : साकव कोसळून 2 मुलांचा मृत्यू, दिघोडे-धुतूम खाडी किनार्‍यावरील घटना

Latest Marathi News आंदोलनात सहभागी एकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.