मोहम्मद शमीवरील शस्त्रक्रिया यशस्वी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या संघाबाहेर आहे. गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा हिरो दुखापतीमुळे मैदानापासून दूर आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला होता. आता शमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे. (Mohammed Shami)
2023 विश्वचषकाचा गोलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केलेल्या मोहम्मद शमीच्या टाचेवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याने शस्त्रक्रियेनंतरचे फोटो शेअर केले आहेत. घोट्याच्या समस्येने त्रस्त असतानाही शमीने 2023 चा संपूर्ण विश्वचषक खेळल्याचे वृत्त होते.
मोहम्मद शमीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. ऑपरेशननंतर शमीने इंस्टाग्रामवर लिहिले की, “माझ्या ऍचिलीस टेंडनवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. बरे होण्यास वेळ लागणार आहे; पण मी माझ्या पायावर उभे राहण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत शमीने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. केवळ 7 सामन्यांमध्ये त्याने 24 विकेट घेतल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सामन्यात त्याने 57 धावांत 7 विकेट घेतल्या होत्या.
Just had a successful heel operation on my achilles tendon! 👟 Recovery is going to take some time, but looking forward to getting back on my feet. #AchillesRecovery #HeelSurgery #RoadToRecovery pic.twitter.com/LYpzCNyKjS
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) February 26, 2024
हेही वाचा :
Shafiqur Rahman Barq : समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते, शफीकुर्रहमान बर्क साहब यांचे निधन
अभिजात दर्जासाठी ताकदीने प्रयत्न : राज्य सरकारच्या समितीतील सदस्यांची ग्वाही
Maharashtra Budget Session 2024 Live : जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश
The post मोहम्मद शमीवरील शस्त्रक्रिया यशस्वी appeared first on Bharat Live News Media.
