Kurkumbh drug case : धुनियाकडून व्हीपीएनचा वापर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आपण तस्करी व उत्पादन करीत असलेल्या मेफेड्रॉनचा तपास यंत्रणेला सुगावा लागू नये म्हणून पुणे ड्रगतस्करीचा मास्टर माइंड संदीप धुनिया हा व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापर करून इतर साथीदारांच्या संपर्कात राहत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. गुन्हे शाखेने पुण्यात, सांगलीतील कुपवाडा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून तब्बल 3 हजार 600 … The post Kurkumbh drug case : धुनियाकडून व्हीपीएनचा वापर appeared first on पुढारी.

Kurkumbh drug case : धुनियाकडून व्हीपीएनचा वापर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : आपण तस्करी व उत्पादन करीत असलेल्या मेफेड्रॉनचा तपास यंत्रणेला सुगावा लागू नये म्हणून पुणे ड्रगतस्करीचा मास्टर माइंड संदीप धुनिया हा व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापर करून इतर साथीदारांच्या संपर्कात राहत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. गुन्हे शाखेने पुण्यात, सांगलीतील कुपवाडा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून तब्बल 3 हजार 600 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त केले. याप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी 10 जणांना अटक केली. या प्रकरणात पुणे पोलिस 7 आरोपींचा शोध घेत असून, ब्रिटनचा पासपोर्ट असणारा संदीप धुनिया हा ड्रग प्रकरणातील मास्टर माइंड समजला जात आहे.
याच रोबर दोन आरोपींविरोधात लूक आऊट नोटीससुद्धा काढण्यात आली आहे. महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने (डीआरआय) 2016 मध्ये संदीप धुनियाला ड्रगप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर जुलै 2023 मध्ये धुनियाला जामीन मिळाला होता. त्यानंतर तो मेफेड्रॉनचा फॉर्म्युला देणार्‍या केमिकल इंजिनिअरचा शोध घेत होता. या वेळी एका मध्यस्थामार्फत डोंबिवली येथील युवराज भुजबळचा संपर्क मिळाला. ऑक्टोबर 2023 पासून कुरकुंभ येथील अर्थकेम या कारखान्यात मेफेड्रॉन बनविले जाऊ लागले.
हेही वाचा

Shafiqur Rahman Barq : समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क साहब यांचे निधन
संतापजनक..! खुनापूर्वी मुलावर लैंगिक अत्याचार
Nashik | एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचा उद्या भूमिपूजन सोहळा

Latest Marathi News Kurkumbh drug case : धुनियाकडून व्हीपीएनचा वापर Brought to You By : Bharat Live News Media.