मनोज जरांगे पाटलांवर प्रथमच गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु, सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यासह ५९ आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. Maharashtra Police registers case … The post मनोज जरांगे पाटलांवर प्रथमच गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

मनोज जरांगे पाटलांवर प्रथमच गुन्हा दाखल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु, सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यासह ५९ आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharashtra Police registers case against Maratha reservation activist Manoj Jarange Patil under sections 341,143,145,149,188 of IPC. Manoj Jarange Patil allegedly instigated common people to block a road in Beed and due to this there was heavy traffic jam and people faced… pic.twitter.com/WM8KGo7SS9
— ANI (@ANI) February 27, 2024

बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेरमध्ये जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याचा आणि जमावबंदी आदेश मोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे समजते.
पोलिसांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्याविरुद्ध कलम ३४१,१४३,१४५,१४९,१८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मनोज जरंगे पाटील यांनी बीडमध्ये सर्वसामान्यांना रस्ता रोको करण्यासाठी चिथावणी दिल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली. बीडमध्ये इतर २५ ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असल्याचे बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.
महाराष्ट्राचा पुन्हा दौरा करणार
आपल्या उपोषणाचे साखळी उपोषणात रूपांतर करीत आहोत. संभाजीनगर येथे उपचार घेतल्यानंतर आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. आपण कुठेही रास्ता रोको केलेला नसताना गुन्हे दाखल झाले आहेत. प्रत्येक वेळी सरकारने पोलिसांचा वापर केला तर जनता ऐकणार नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा : 

जरांगे रूग्णालयात दाखल; आज भूमिका जाहिर करणार
‘मुख्यमंत्री, जरांगे यांच्यातील बोलणी जाहीर करा’
राज्य कर्मचार्‍यांना पेन्शनचा नवा पर्याय

Latest Marathi News मनोज जरांगे पाटलांवर प्रथमच गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.