बँड वाजताच दीड कोटी जमा; एका दिवसातील विक्रमी मिळकतकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मिळकतकर थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजविल्यामुळे पहिल्याच दिवशी महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी 58 लाख रुपये महसूल जमा झाला आहे. दरम्यान, या आर्थिक वर्षात आजपर्यंत एकूण 1 हजार 968 कोटी रुपये इतका मिळकत कर जमा झाला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाकडे पाहिले जाते. सन 2023-24 या … The post बँड वाजताच दीड कोटी जमा; एका दिवसातील विक्रमी मिळकतकर appeared first on पुढारी.

बँड वाजताच दीड कोटी जमा; एका दिवसातील विक्रमी मिळकतकर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मिळकतकर थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजविल्यामुळे पहिल्याच दिवशी महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी 58 लाख रुपये महसूल जमा झाला आहे. दरम्यान, या आर्थिक वर्षात आजपर्यंत एकूण 1 हजार 968 कोटी रुपये इतका मिळकत कर जमा झाला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाकडे पाहिले जाते. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी या विभागाला 2,318 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी करआकारणी व करसंकलन कार्यालयाकडून थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यानुसार मिळकतजप्तीच्या कारवाईसह थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजविला जात आहे. थकबाकी वसुलीसाठी सोमवार (दि. 26) पासून मिळकतदारांच्या मिळकतीसमोर बँड वाजविण्यास सुरुवात झाली. थकीत मिळकतकराच्या वसुलीसाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर नोटीस बजाविण्यात आलेल्या मिळकतींचा यात समावेश आहे. नोटीस वॉरंट बजाविण्यात आलेल्या मिळकतींची संख्या 1200 इतकी आहे. बँडच्या धास्तीने (सोमवारी) एका दिवशी महापालिकेकडे 8 कोटी 45 लाख रुपये इतका महसूल जमा झाला आहे. बँड वाजविण्यात आल्यानंतर 1 कोटी 58 लाख रुपये महसूल जमा झाल्याची माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी कळविली आहे. गेल्या तीन दिवसांत 30 मिळकतींवर जप्तीची कारवाई केली तसेच या तीन दिवसांत महापालिकेकडे 9 कोटी 25 लाख रुपये इतका महसूल जमा झाला आहे.
सुटीच्या दिवशीही भरता येणार कर
नागरिकांना मिळकतकर भरता यावा, यासाठी नागरी सुविधा केंद्रे सर्व शासकीय सुटीच्या दिवशी व शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत, तर रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत खुली असतील. त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीनेही मिळकतकर भरता येईल.
हेही वाचा

कोल्हापूर : यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट
मुख्यमंत्री, जरांगे यांच्यातील बोलणी जाहीर करा : पटोले
आंदोलनाला हिंसक वळण; जालन्याजवळ बस पेटविली

Latest Marathi News बँड वाजताच दीड कोटी जमा; एका दिवसातील विक्रमी मिळकतकर Brought to You By : Bharat Live News Media.