गुहागर-विजापूर महामार्गावर अपघात: बेणापूरचे २ तरुण ठार, १ जखमी

विटा : पुढारी वृत्तसेवा: गुहागर – विजापूर राष्ट्रीय मार्गावर दुचाकी आणि चारचाकी गाडीच्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास खानापूरजवळ घडली. रुपेश शेखर गायकवाड (वय २८) आणि सुमित प्रविण धेंडे (वय १४) अशी मृतांची नावे असून हे दोघेही बेणापूर (ता. खानापूर) येथील आहेत. तर … The post गुहागर-विजापूर महामार्गावर अपघात: बेणापूरचे २ तरुण ठार, १ जखमी appeared first on पुढारी.

गुहागर-विजापूर महामार्गावर अपघात: बेणापूरचे २ तरुण ठार, १ जखमी

विटा : पुढारी वृत्तसेवा: गुहागर – विजापूर राष्ट्रीय मार्गावर दुचाकी आणि चारचाकी गाडीच्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास खानापूरजवळ घडली. रुपेश शेखर गायकवाड (वय २८) आणि सुमित प्रविण धेंडे (वय १४) अशी मृतांची नावे असून हे दोघेही बेणापूर (ता. खानापूर) येथील आहेत. तर अश्वजित दाजी धेंडे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. Sangli Accident
याबाबत खानापूर पोलिसांनी सांगितले की, बेणापूर येथील रहिवासी रुपेश गायकवाड हा रात्री अकराच्या सुमारास आपल्या विश्वजीत धेंडे आणि सुमित धेंडे या दोन मित्रांसह खानापूरकडून बेणापूरकडे त्याच्या दुचाकी गाडीवरून (एचएफ डिलक्स एम. एच. १० डी आर ७२४१) चालला होता. यावेळी भिवघाटकडून खानापूरकडे चाललेल्या चारचाकी गाडी (एपी ०७ सीएम ५६६५) ची रुपेश गायकवाड याच्या गाडीशी धन निरंकार सत्संग केंद्राजवळ समोरासमोर धडक झाली. Sangli Accident
ही धडक एवढी जोरदार होती की, त्यात दुचाकी गाडीवरील रुपेश गायकवाड आणि सुमित धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अश्वजित धेंडे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर भिवघाटच्या खासगी इस्पितळात उपचार करून पुढील उपचारासाठी सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अपघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी पाठवले. तसेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करंजे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
हेही वाचा 

सांगली : चूक बिबट्यांची नव्हे… दोन पायांच्या प्राण्यांची…
सांगली: मनोज जरांगे यांच्या रॅलीत चोऱ्या करणारी टोळी जेरबंद: विटा पोलिसांची कारवाई
ऊस दरासाठी सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको

The post गुहागर-विजापूर महामार्गावर अपघात: बेणापूरचे २ तरुण ठार, १ जखमी appeared first on पुढारी.

विटा : पुढारी वृत्तसेवा: गुहागर – विजापूर राष्ट्रीय मार्गावर दुचाकी आणि चारचाकी गाडीच्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास खानापूरजवळ घडली. रुपेश शेखर गायकवाड (वय २८) आणि सुमित प्रविण धेंडे (वय १४) अशी मृतांची नावे असून हे दोघेही बेणापूर (ता. खानापूर) येथील आहेत. तर …

The post गुहागर-विजापूर महामार्गावर अपघात: बेणापूरचे २ तरुण ठार, १ जखमी appeared first on पुढारी.

Go to Source