नाशिक : पाण्याची टाकी साफ करताना युवकाचा मृत्‍यू

नाशिक : पाण्याची टाकी साफ करताना युवकाचा मृत्‍यू

सिडको : पुढारी वृत्तसेवा पाथर्डीफाटा येथील हॉटेलची पाण्याची टाकी स्वच्छ करीत असताना विजेचा शॉक लागुन युवकाचा मृत्यू झाला. ऐन दिपावली सणाच्या दिवशीच ही दुदैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत पोलिसानी दिलेली अधिक माहिती अशी की, भुषण दिगंबर शिनकर, (वय 30), खुटवड नगर, कामटवाडा हे सोमवारी दुपारी दिड वाजता पाथर्डीफाटा येथील हॉटेल सुखसागरची पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना पाण्याच्या टाकीत पडून त्‍यांना शॉक लागला. त्यांना उपचारासाठी त्यांचा भाउ विजय शिनकर यांनी वक्रतुंड हॉस्पीटल नाशिक येथे दाखल केले. यावेळी डॉ. सागर मंडलिक यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार अतुल बनतोडे करीत आहेत. विजेचा शॉक लागले बाबत पोलिसांनी विद्युत विभागाला पत्र देऊन माहिती मागितली आहे. ऐन दिपावली सणाच्या दिवशी दुदैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत शिनकर व त्यांचा भाऊ विजय हे पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम घेत होते.
The post नाशिक : पाण्याची टाकी साफ करताना युवकाचा मृत्‍यू appeared first on पुढारी.

सिडको : पुढारी वृत्तसेवा पाथर्डीफाटा येथील हॉटेलची पाण्याची टाकी स्वच्छ करीत असताना विजेचा शॉक लागुन युवकाचा मृत्यू झाला. ऐन दिपावली सणाच्या दिवशीच ही दुदैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या बाबत पोलिसानी दिलेली अधिक माहिती अशी की, भुषण दिगंबर शिनकर, (वय 30), खुटवड नगर, कामटवाडा हे सोमवारी दुपारी दिड वाजता पाथर्डीफाटा येथील …

The post नाशिक : पाण्याची टाकी साफ करताना युवकाचा मृत्‍यू appeared first on पुढारी.

Go to Source