
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात हिंदूंना पूजेला परवानगी देण्याचा निकाल जिल्हा न्यायालयाने दिला हाेता. या निर्णयाविरोधात अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतेजामियाच्या आदेशावरील पहिले अपील फेटाळून लावले, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. यामुळे आता मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पूजा सुरूच राहणार आहे.
वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिली हाेती पूजेला परवानगी
वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पुजाऱ्यांना पूजेला परवानगी दिली होती. १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मशिदीच्या आवारात धार्मिक विधी पार पडले.नंतर दक्षिणेकडील तळ भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळात उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असे स्पष्ट केले होते. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या वतीने अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. दरम्यान, १३ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्ञानवापी परिसराला भेट दिली आणि ‘व्यास का तेखाना’ येथे पूजा केली होती.
न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने अंजुमन इंतेजामियाच्या आदेशाविराेधातील पहिली याचिका फेटाळून लावले आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. यामुळे आता मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पूजा सुरूच राहणार आहे.
#WATCH | Gyanvapi matter | Advocate Prabhash Pandey says, “The judge dismissed the pleas that the Muslim side had filed against the District Judge’s order…It means that the puja will continue as it is. District Magistrate will continue as the Receiver of the ‘tehkhana’…This… https://t.co/TjTZhSrhCi pic.twitter.com/Qa6OFI2731
— ANI (@ANI) February 26, 2024
The post माेठी बातमी : ‘ज्ञानवापी’च्या तळघरातील पूजेविराेधात दाखल याचिका फेटाळली appeared first on Bharat Live News Media.
