गोंदियाच्या स्वर्णाला ऑस्ट्रेलियात २ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शिक्षण क्षेत्रात मुलांपेक्षा मुली वेगाने प्रगती करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या घोषणेला सार्थ ठरवत आहेत. याचे उदाहरण गोंदियाच्या स्वर्णा नायडू या विद्यार्थिनीने सादर केले आहे. स्वर्णाला आस्ट्रेलिया येथे 2 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून तिला ऑस्ट्रेलियाच्या वोलोंगॉन्ग विद्यापीठात डॉक्टरेटसाठी प्रवेश मिळाला आहे. गोंदियाच्या … The post गोंदियाच्या स्वर्णाला ऑस्ट्रेलियात २ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती appeared first on पुढारी.

गोंदियाच्या स्वर्णाला ऑस्ट्रेलियात २ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : शिक्षण क्षेत्रात मुलांपेक्षा मुली वेगाने प्रगती करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या घोषणेला सार्थ ठरवत आहेत. याचे उदाहरण गोंदियाच्या स्वर्णा नायडू या विद्यार्थिनीने सादर केले आहे. स्वर्णाला आस्ट्रेलिया येथे 2 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून तिला ऑस्ट्रेलियाच्या वोलोंगॉन्ग विद्यापीठात डॉक्टरेटसाठी प्रवेश मिळाला आहे.

गोंदियाच्या धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातून स्वर्णाने विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केल्यानंतर, भोपाळमधील भारत सरकारच्या आय. आय. एस.इ.आर. महाविद्यालयात प्रवेश घेत रसायनशास्त्रात एम एसची परीक्षा प्राविण्यसह उत्तीर्ण केली. स्वर्णाचे भौतिक रसायनशास्त्र क्षेत्रातील प्रयोग आणि अनेक जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या तिच्या लेखांमुळे प्रभावित होऊन तिला उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियन रिसर्च कौन्सिलची 2 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तिला ऑस्ट्रेलियाच्या शासकीय वोलोंगॉन्ग विद्यापीठात डॉक्टरेटसाठी प्रवेश मिळाला आहे. स्वर्णा नायडू यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू आणि विभाग प्रमुख डॉ. मनोज पटेल यांनी प्रोत्साहन दिले, त्यामुळेच ती इतक्या कमी वयात एवढे उच्च स्थान मिळवू शकली असल्याचे ती सांगते. स्वर्णाची आई सत्यलक्ष्मी नायडू यांनी गोंदियाच्या मनोहरभाई पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आर्किटेक्चर विभाग प्रमुख म्हणून सेवा दिली असून सद्या त्या सरस्वती ट्युटोरियल्सच्या संचालक आहेत. स्वर्णाने तिचे वडील प्रसाद नायडू आणि आई सत्यलक्ष्मी नायडू यांना तिचे प्रेरणास्थान मानले आहे.

हेही वाचा

IND vs ENG Test : रोहित-यशस्वीची दमदार सुरूवात; भारत मजबूत स्थितीत
यामी गौतमचा ‘Article 370’, ‘कॅक’ची चांगली सुरुवात

Latest Marathi News गोंदियाच्या स्वर्णाला ऑस्ट्रेलियात २ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती Brought to You By : Bharat Live News Media.