कॅन्सरवर भारतीय ‘मसाले’ ठरणार रामबाण उपाय; आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मसाल्यांमुळे जेवणाची चव तर वाढतेच पण असे अनेक मसाले आहेत जे कर्करोगासारख्या आजारांवर रामबाण उपाय ठरतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रास येथील संशोधकांनी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट घेतले आहे. हे पेटंट कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराच्या उपचारात प्रभावी ठरू शकतात. या मसाल्यांचा वापर करून औषधी गुणधर्म असलेली औषधे 2028 पर्यंत बाजारात उपलब्ध … The post कॅन्सरवर भारतीय ‘मसाले’ ठरणार रामबाण उपाय; आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट appeared first on पुढारी.
कॅन्सरवर भारतीय ‘मसाले’ ठरणार रामबाण उपाय; आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मसाल्यांमुळे जेवणाची चव तर वाढतेच पण असे अनेक मसाले आहेत जे कर्करोगासारख्या आजारांवर रामबाण उपाय ठरतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रास येथील संशोधकांनी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट घेतले आहे. हे पेटंट कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराच्या उपचारात प्रभावी ठरू शकतात. या मसाल्यांचा वापर करून औषधी गुणधर्म असलेली औषधे 2028 पर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. २५) सांगितले.
आयआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय मसाल्यापासून बनवलेल्या नॅनो औषधांचा फुफ्फुस, स्तन, कोलन, ग्रीवा, तोंडी आणि थायरॉईडमधील कर्करोगाच्या पेशींवर परिणाम दिसून आला आहे. मात्र, ही औषधे सामान्य पेशींमध्ये सुरक्षित असल्याचे आढळून आले. संशोधक सध्या कर्करोगाच्या औषधांची सुरक्षा आणि किंमत या मुद्द्यांवर काम करत आहेत. सध्याच्या कर्करोगांवरील औषधांसाठी सुरक्षा आणि किंमत ही प्रमुख आव्हाने आहेत.
ते म्हणाले की, प्राण्यांवर अलीकडेच यशस्वी अभ्यास करण्यात आला आहे. आता 2027-28 पर्यंत ही औषधे बाजारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्लिनिकल चाचण्यांचे नियोजन केले जात आहे.
भारतीय मसाल्यांचे अनेक वर्षांपासून आरोग्यासाठी फायदे
पुढे याबाबत अधिक माहिती देत असताना आयआयटी मद्रासच्या केमिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक आर. नागराजन म्हणाले की, भारतीय मसाल्यांचे अनेक वर्षांपासून आरोग्यासाठी फायदे आहेत. त्यांच्या जैवउपलब्धतेमुळे त्यांचा उपयोग आणि वापर मर्यादित आहे. नॅनो-इमल्शन फॉर्म्युला या मर्यादांवर मात करते. नॅनो-इमल्शनची स्थिरता विचारात घेणे महत्त्वाचे होते आणि हे सूत्र आमच्या प्रयोगशाळेत स्वीकारले गेले. ते म्हणाले, “कर्करोगाच्या पेशींशी सक्रिय घटक आणि त्यांच्या संवादाच्या पद्धती ओळखण्यासाठी अभ्यास आवश्यक आहेत आणि हे अभ्यास आमच्या प्रयोगशाळांमध्ये सुरूच राहतील,” ते म्हणाले.
नागराजन म्हणाले की, नॅनो-ऑन्कोलॉजीचे पारंपरिक कर्करोग उपचार थेरपीपेक्षा बरेच फायदे आहेत. त्यांनी सांगितले की नॅनो-ऑन्कोलॉजीमध्ये कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि उपचारांचा खर्च कमी आहे.
हेही वाचा

HCES Survey In India: मागील दशकभरात कुटुंबाच्या मासिक खर्चात ‘दुप्पट’ वाढ; जाणून घ्या ‘NSSO’ सर्वेक्षण काय सांगते?

Latest Marathi News कॅन्सरवर भारतीय ‘मसाले’ ठरणार रामबाण उपाय; आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट Brought to You By : Bharat Live News Media.