ध्रुव जुरेलची धोनी-पंतच्या क्लबमध्ये एन्ट्री!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 353 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 307 धावा करता आल्या. मात्र या डावात युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळाली. तो 90 धावांवर बाद … The post ध्रुव जुरेलची धोनी-पंतच्या क्लबमध्ये एन्ट्री! appeared first on पुढारी.

ध्रुव जुरेलची धोनी-पंतच्या क्लबमध्ये एन्ट्री!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 353 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 307 धावा करता आल्या. मात्र या डावात युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळाली. तो 90 धावांवर बाद झाला. त्याचे शतक जरी हुकले असले तरी त्याने आपल्या लढाऊ खेळीने चाहत्यांची मने नक्कीच जिंकली आहेत.
रांची कसोटीत ध्रुव जुरेलची धडाकेबाज खेळी
ध्रुव जुरेलने रांची कसोटीत महत्त्वाच्या क्षणी लढाऊ खेळी खेळली. तो फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघाने 5 बाद 161 धावा केल्या होत्या आणि 192 धावांनी पिछाडीवर होता. पण ध्रुव जुरेलने कठीण परिस्थितीत 149 चेंडूत 90 धावा केल्या आणि भारताला इंग्लंडच्या एकूण धावसंख्येच्या जवळ जाण्यास मदत केली. या खेळीदरम्यान जुरेलने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने राजकोट कसोटीत 46 धावांची इनिंग खेळली होती. (Dhruv Jurel Record)
जुरेलला विशेष यादीत स्थान (Dhruv Jurel Record)
यष्टिरक्षक म्हणून ध्रुव जुरेल कसोटीतील पहिल्या दोन डावांनंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या दोन डावात 136 धावा केल्या आहेत. या यादीत माजी कसोटीपटू विजय मांजरेकर आघाडीवर आहेत. विजय मांजरेकर यांनी यष्टिरक्षक म्हणून कसोटीतील पहिल्या दोन डावांत 161 धावा केल्या होत्या.
कसोटीत पहिल्या दोन डावात भारतीय यष्टीरक्षकाने केलेल्या सर्वाधिक धावा
विजय मांजरेकर : 161 धावा
ध्रुव जुरेल : 136 धावा
दिलावर हुसेन : 116 धावा
केएल राहुल : 105 धावा
नयन मोंगिया : 62 धावा
धोनी-पंतच्या क्लबमध्ये सामील (Dhruv Jurel Record)
ध्रुव जुरेल कसोटीत 90 किंवा त्याहून अधिक धावा केल्यानंतर शतक हुकणारा भारताचा 5वा यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. ऋषभ पंतचे कसोटीत 90 किंवा त्याहून अधिक धावा केल्यानंतर 6 वेळा शतक हुकले आहे. तर एमएस धोनीसोबत त्याच्या कारकिर्दीत असे 5 वेळा घडले आहे.
90 किंवा त्याहून अधिक धावा केल्यानंतर शतक हुकलेले भारतीय यष्टीरक्षक (कसोटी)
6 वेळा : ऋषभ पंत
5 वेळा : एमएस धोनी
1 वेळ : ध्रुव जुरेल
1 वेळ : दिनेश कार्तिक
1 वेळ : फारुख इंजीनियर
Latest Marathi News ध्रुव जुरेलची धोनी-पंतच्या क्लबमध्ये एन्ट्री! Brought to You By : Bharat Live News Media.