तो एक चित्रकार…रांची कसोटीत एक अनोखे दृश्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट आणि चित्रकला. एक खेळ तर दुसरी कला. तसा दोघांचाही परस्‍पर संबंध नाही. प्रसिद्ध क्रिकेटपटूंचे हौशी किंवा प्रसिद्ध चित्रकाराने चित्र रेखाटणे एवढा मर्यादीत संबंध. मात्र मैदानावर सामना सुरु असताना चित्र काढणे तसं दुर्मिळच. हे सारं सांगण्‍याचा अट्टहास एवढ्यासाठी की, रांचीतील भारत आणि इंग्‍लंड कसोटी सामन्‍यात एका चित्रकाराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. … The post तो एक चित्रकार…रांची कसोटीत एक अनोखे दृश्य appeared first on पुढारी.

तो एक चित्रकार…रांची कसोटीत एक अनोखे दृश्य

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : क्रिकेट आणि चित्रकला. एक खेळ तर दुसरी कला. तसा दोघांचाही परस्‍पर संबंध नाही. प्रसिद्ध क्रिकेटपटूंचे हौशी किंवा प्रसिद्ध चित्रकाराने चित्र रेखाटणे एवढा मर्यादीत संबंध. मात्र मैदानावर सामना सुरु असताना चित्र काढणे तसं दुर्मिळच. हे सारं सांगण्‍याचा अट्टहास एवढ्यासाठी की, रांचीतील भारत आणि इंग्‍लंड कसोटी सामन्‍यात एका चित्रकाराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सामना सुरु असताना तो मैदानाचे चित्र रेखाटतोय त्‍याचबरोबर क्रिकेटपटूंचे चित्रही आपल्‍या कुंचल्‍याने साकारतोय. त्‍याचे नाव आहे ॲन्डी ब्रॉऊन. तो मुळचा आहे इंग्‍लंडचा. (IND vs ENG 4th Test Day 3)
ॲन्डी ब्रॉऊन यांनी आधीही विविध सामन्यांमध्ये हजेरी लावून आपल्या कॅनव्हासवर मैदानांचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी रेखाटलेले मैदानाचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या सामन्यात त्यांनी मैदानाच्या विविध ठिकाणी बसून मैदानाचे चित्र रेखाटले आहे. ॲन्डी ब्रॉऊन  हे ब्रिटिश नागरिक आहेत. ते जगभरातील विविध सामन्यांना हजेरी लावून आपल्या चित्राच्या माध्यमातून ते क्षण टिपण्याचे काम करत असतात. खेळ आणि मैदानांवर चित्र रेखाटणे हा त्‍यांचा छंद आहे. (IND vs ENG 4th Test Day 3)
रांची मैदानाचे चित्र ठरलं लक्षवेधी
रांची येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. हा सामना आता रोमांचकारी वळणावर आला आहे. इंग्लंडचा गोलंदाजांचा भेदक मारा आणि फिरकीच्या जाळ्याला बगल देत भारतीय फलंदाज धावफलक हलता ठेवत आहेत. कुलदीप आणि ध्रुव या जोडीने आठव्या विकेटसाठी 193 चेंडूत 73 धावांची भागिदारी रचली आहे. हा रोमांचकारी सामना पाहताना क्रिकेटप्रेमींना  चित्रकाराचे ॲन्डी ब्रॉऊन आपल्या कॅनव्हासवर मैदानाचे चित्र रेखाटत आहेत. त्यांनी रेखाटलेले मैदानाचे चित्र सर्वांचे लक्षवेधी ठरले आहे. या सामन्यात त्यांनी मैदानाच्या विविध ठिकाणी बसून मैदानाचे चित्र रेखाटले आहे.

Today’s artwork made LIVE from #Ranchi featuring #bashir #ShoaibBashir bowling finishing the day 84-4
Prints and original available https://t.co/6GyRB7vvE0 🏏🇮🇳🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🎨#EnglandCricket#ENGvIND pic.twitter.com/LRuyYYaYgm
— Andy Brown (@andybisanartist) February 24, 2024

हेही वाचा :

Ramlalla New Photo: ‘रामलल्ला’ची मूर्ती साकारतानाचा फाेटाे अरुण योगीराज यांनी केला शेअर
पाचव्या मजल्यावर पेट्रोल पंप आणि पाण्यावर तरंगणारी इमारत!
Jalgaon Crime News | दहशत माजवणाऱ्या कोयतागँगचा फरार आरोपीस चाळीसगावमधून अटक

Latest Marathi News तो एक चित्रकार…रांची कसोटीत एक अनोखे दृश्य Brought to You By : Bharat Live News Media.