मीच कंपनीचा ‘सीईओ’, बाकी सर्व अफवा : बायजू रवींद्रन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मी आजही कंपनीचा सीईओ आहे. व्‍यवस्‍थापनात कोणताही बदल झालेला नाही. मला पदावरुन हटवले, ही अफवा आहे, असे  एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी ‘बायजू’चे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी कर्मचार्‍यांना लिहिलेल्‍या पत्रात स्‍पष्‍ट केले आहे. गैरव्यवस्थापन आणि अपयशचा ठपका ठेवत ‘बायजू’च्या ६० टक्‍के गुतवणूकदारांनी बायजू रवींद्रन यांना सीईओ पदावरुन हटवावे तसेच त्‍यांना कंपनीच्‍या मंडळातून काढून … The post मीच कंपनीचा ‘सीईओ’, बाकी सर्व अफवा : बायजू रवींद्रन appeared first on पुढारी.
मीच कंपनीचा ‘सीईओ’, बाकी सर्व अफवा : बायजू रवींद्रन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : मी आजही कंपनीचा सीईओ आहे. व्‍यवस्‍थापनात कोणताही बदल झालेला नाही. मला पदावरुन हटवले, ही अफवा आहे, असे  एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी ‘बायजू’चे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी कर्मचार्‍यांना लिहिलेल्‍या पत्रात स्‍पष्‍ट केले आहे. गैरव्यवस्थापन आणि अपयशचा ठपका ठेवत ‘बायजू’च्या ६० टक्‍के गुतवणूकदारांनी बायजू रवींद्रन यांना सीईओ पदावरुन हटवावे तसेच त्‍यांना कंपनीच्‍या मंडळातून काढून टाकावे, यासाठी मतदान केले होते. यानंतर रवींद्रन यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केले आहे.
( I remain CEO : Byju Raveendran )
आपल्‍या पत्रात रवींद्रन यांनी म्‍हटले आहे की, शुक्रवार झालेल्‍या कंपनीच्‍या सर्वसाधारण सभेत (EGM) अनेक महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन झाले. या बैठकीत काही निर्णय हे नियमबाह्य होते. माझ्या कंपनीचा सीईओ म्हणून मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे.  मीच कंपनीचा सीईओ राहणार आहे. व्यवस्थापनात कोणताही बदल होणार नाही आणि मंडळही तसेच राहील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. बाकी सर्व अफवा आहेत. गुंतवणूकदारांची बैठकीला योग्‍य संख्‍याबळ नव्‍हते. या बैठकीत किमान एका संस्थापक संचालकाची उपस्थिती आवश्यक होती, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. ( I remain CEO : Byju Raveendran )
कंपनीकडून FEMA कायद्याचे उल्लंघन : ईडीचा दावा
नुकतीच ईडीने बायजू रवींद्रन यांना बजावलेल्‍या नोटीसमध्‍ये म्‍हटले हेते की, “कंपनीने नमूद केले होते की, त्यांनी भारताबाहेर महत्त्वपूर्ण परदेशी निधी पाठवला आणि परदेशात गुंतवणूक केली, जी FEMA, 1999 च्या तरतुदींचे कथित उल्लंघन करते आणि त्यामुळे भारत सरकारच्या महसुलाचे नुकसान झाले आहे”. (Byju’s News)
एप्रिल 2023 च्या छापेमारीनंतर ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, बायजूच्या फेमा शोधातून असे दिसून आले की, कंपनीला 2011 ते 2023 पर्यंत सुमारे 28,000 रुपये कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक मिळाली. यामधून कंपनीने विविध देशांना 9,754 रुपये कोटी पाठवले आहेत. याच काळात त्यांनी थेट परकीय गुंतवणुकीच्या नावावर दावा केला होता. आता बायजू रवींद्रन यांच्याविरुद्ध लूकआऊट सर्कुलर बजावण्यास सांगण्यात आले होते.

STORY | I remain CEO; Rumours of my firing greatly exaggerated, inaccurate: Byju Raveendran to staff
READ: https://t.co/fpP4ehApIu pic.twitter.com/JgyBZhde3X
— Press Trust of India (@PTI_News) February 24, 2024

हेही वाचा : 

artificial intelligence : कृत्रिम बुद्धिमत्तेवर रिस्क रिपोर्ट; सर्वाधिक धोका मानवाला
EPFO ​​चा मोठा निर्णय, जन्मतारखेचा पुरावा म्हणून ‘आधार कार्ड’ची वैधता संपली

 
Latest Marathi News मीच कंपनीचा ‘सीईओ’, बाकी सर्व अफवा : बायजू रवींद्रन Brought to You By : Bharat Live News Media.