फडणवीस, मुनगंटीवार यांना धमक्या, मस्की दाम्पत्यावर गुन्हा दाखल
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
धमकी देणाऱ्या व्हिडिओनंतर भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून गडचांदूर पोलिसांनी बाबा मस्की, शोभा मस्की या दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. राजुरा शहरात सातत्याने विविध आंदोलनात सहभागी होणारे बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याने ते करीत असलेल्या आंदोलनांकडे देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्याबद्दल शिवीगाळ व धमकी देणाऱ्या भाषेचा वापर केला. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असून कार्यकर्त्यांनी गडचांदूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विदर्भ राज्याचे आंदोलन, अतिक्रमित शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे, वन्यजीवांद्वारे पिकांचे नुकसान यावर बोलताना मस्की दाम्पत्याने या नेत्यांबद्दल अपशब्द वापरून त्यांना धमक्या दिल्या होत्या.
हेही वाचा
अनिल देशमुखांची वाढणार अडचण? मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाकडून नकार: मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा
The post फडणवीस, मुनगंटीवार यांना धमक्या, मस्की दाम्पत्यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्हिडिओनंतर भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून गडचांदूर पोलिसांनी बाबा मस्की, शोभा मस्की या दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. राजुरा शहरात सातत्याने विविध आंदोलनात सहभागी होणारे बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याने …
The post फडणवीस, मुनगंटीवार यांना धमक्या, मस्की दाम्पत्यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.