जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

पैठण, पुढारी वृत्तसेवा: नाशिक आणि नगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२१) झालेल्या सुनावणीदरम्यान नकार दिला. आणि उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे पैठण सोसायटीचे चेअरमन तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष निमेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली … The post जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार appeared first on पुढारी.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

पैठण, पुढारी वृत्तसेवा: नाशिक आणि नगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२१) झालेल्या सुनावणीदरम्यान नकार दिला. आणि उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे पैठण सोसायटीचे चेअरमन तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष निमेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली पैठण बस स्थानकाच्या परिसरात फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
निमेश पटेल यांनी सांगितले की, आमच्या पैठण सोसायटीतर्फे माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी याचिका दाखल केली होती. काल छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा जन आंदोलन पाणी समितीतर्फे सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले होते. परंतु, शासनाने धक्काबुक्की करून आंदोलनकर्त्यांना अटक केली. यावेळी माजी राज्यमंत्री तथा याचिककर्ता अनिल पटेल यांच्या हाताला दुखापत झाली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे शासनाला आता जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागणार आहे.
या वेळी माजी शिवसेना तालुका प्रमुख अरुण काळे, माजी नगरसेवक अजित पगारे, शिवसेना शहर प्रमुख अजय परळकर, सोसायटीचे संचालक गणेश संकुंडे, अरुण घोडके, महेश पवार, योगेश टेकाळे, युवक शहर अध्यक्ष योगेश शिपणकर, आशिष पवार, नंदकिशोर नजन, हमीद खान, भीमराव नावगिरे, बंडू महाराज गाढे, दिनेश माळवे, दादू पटेल, पप्पू खोचे, सोमनाथ दारूनकर, सुदाम पाचे, अक्षय करकोटक, बबलू शेख, विक्रम गिरगे आदीसह शेतकरी, सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
The post जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार appeared first on पुढारी.

पैठण, पुढारी वृत्तसेवा: नाशिक आणि नगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२१) झालेल्या सुनावणीदरम्यान नकार दिला. आणि उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे पैठण सोसायटीचे चेअरमन तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष निमेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली …

The post जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार appeared first on पुढारी.

Go to Source